25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाकपलिंग तुटले.. शान ए पंजाब एक्स्प्रेसचे दोन तुकडे, डबे मागे ठेऊन गाडी...

कपलिंग तुटले.. शान ए पंजाब एक्स्प्रेसचे दोन तुकडे, डबे मागे ठेऊन गाडी गेली पुढे

गाडीचे डबा जोडणारे कपलिंग अचानक तुटले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित.

Google News Follow

Related

शान ए पंजाब एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने वेगाने धावतेय. एकेक स्टेशन मागे जातेय. पानिपत जिल्ह्यातील समलाखा स्टेशनच्या दिशेने येत असताना अचानक विचित्र घटना घडली. गाडीचे डबा जोडणारे कपलिंग अचानक तुटले आणि काही कळायच्या आता एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. उरलेलं डबे घेऊन शान ए पंजाब एक्स्प्रेस पुढे गेली. या विचित्र अपघातानंतर समलखा रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर एकच गोंधळ उडाला.

सुदैवाने डबे रुळावरून घसरले नाहीत आणि मोठी दुर्घटना टळली. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा रेल्वे स्थानकाजवळ शान-ए-पंजाब एक्स्प्रेसची धावत्या गाड्याचे दोन भाग झाले. कपलिंग तुटल्याने अचानक मागचे डब्बे जागीच थांबलेआणि गाडी पुढचे डबे घेऊन पुढे गेली. मनाना गावातील फाटकाजवळ बुधवारी सकाळी शान-ए-पंजाब ट्रेनचे डबे अचानक वेगळे झाले. अचानक रेल्वेचे डबे वेगळे झाल्याचे पाहून प्रवाशांना धक्काच बसला. सर्व प्रवासी मोठी दुर्घटना घडू शकते या भीतीने ते घाबरले, पण सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठोठावला मुंबई हायकोर्टचा दरवाजा

पंखे थरथरले, भांडी कोसळली .. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली

आम आदमी पार्टीने लावले मोदींविरोधातले पोस्टर्स…१०० एफआयआर, ६ अटकेत

खलिस्तान समर्थक अमृतपालने रंगरूप बदलून काढला पळ! नवी माहिती आली समोर

गाडीचे डबे वेगळे झाल्यानंतर डब्यांचा वेग कमी होत ते रुळावर थांबताच अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी सर्व प्रवासी खाली उतरले. पुढचे डबे घेऊन गाडी पुढे गेली होती. या घटनेची माहिती मिळताच चालकाने ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याने सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला.यानंतर इंजिनीअर्सच्या मदतीने गाडीचे डबे पुन्हा जोडण्यात आले आणि सकाळी साडेआठ वाजता पुन्हा इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा