अजूनही भारत हा आमचा गुलाम आहे, अशा भ्रमात ब्रिटन बहुधा आजही आहे. ब्रिटनमधील भारतीय दुतावासाला सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे खलिस्तानी समर्थकांनी जो गोंधळ घातला होता त्याचे पडसाद जगभर उमटलेच पण भारताने त्याला चोख उत्तर देत भारतातील ब्रिटिश दुतावासाची सुरक्षा कमी केली. तेव्हा ब्रिटिश ताळ्यावर आले.
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंग्याचा अपमान काही खलिस्तान समर्थकांनी केल्यावरून भारतातच नव्हे तर जगभरात संताप व्यक्त होत असताना सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत ब्रिटनने जी बेपर्वाई दाखविली त्याला आता भारताने चोख उत्तर दिले आहे. आणि भारताने हे प्रत्युत्तर दिल्यामुळे ब्रिटिश सरकारचेही डोळे उघडले आहेत. ब्रिटननेही आता भारतीय उच्चायुक्तालयाला ताबडतोब सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे.
हे ही वाचा:
ओमानमधून मुसक्या आवळून झाकीर नाईकला भारतात आणणार?
‘शोभायात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि मग त्याचे सगळ्यांनी अनुकरण केले’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठोठावला मुंबई हायकोर्टचा दरवाजा
नितीन गडकरी खंडणी धमकीप्रकरणाच्या मागे एक तरुणी
नवी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात ब्रिटनचा दूतावास आहे. त्याठिकाणी इमारतीबाहेर असलेले सगळे संरक्षणात्मक अडथळे दूर करण्यात आले आहेत. ब्रिटिश उच्चायुक्त एलेक्स एलिस यांचे राजाजी मार्ग येथे निवासस्थान आहे. बुधवारी भारताने ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या बाहेरील सुरक्षा कमी करण्यास प्रारंभ केला. ब्रिटनमधील भारतीय दूतावासाबाहेर झालेल्या खलिस्तान समर्थकांच्या गोंधळाच्या वेळी कोणतेही पोलिस तिथे नव्हते. त्यामुळे भारतीय तिरंग्याचा तेव्हा अपमान झाला होता. त्याची परतफेड आता भारताने ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या बाहेरची सुरक्षा कमी करून केली आहे.
यासंदर्भात ब्रिटिश उच्चायुक्तालयाने म्हटले आहे की, सुरक्षेच्या संदर्भात आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. ब्रिटनमधील भारतीय दुतावासाजवळ जो खलिस्तानी समर्थकांनी राडा केला त्यानंतर बऱ्याच वेळाने ब्रिटनमधील पोलिसांनी तिथे धाव घेतली. खरेतर भारतीय दूतावासाने असा हल्ला उच्चायुक्तालयावर होऊ शकतो याची खबर ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिली होती.