23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री आणि  हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज मंगळवारी २१ मार्च २०२३ या दिवशी पुणे येथे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज सावरकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले तर त्यांचे कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर हे सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष असून मुरवाड येथे ते राहातात.  आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात, स्वामिनी सावरकर या त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहात होत्या. पती विक्रम सावरकर यांच्यासोबत त्यांनी प्रज्वलंत नावाच्या वृत्तपत्राचे कामही सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही त्यांनी पाहिले, तेथे त्या कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या  गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोखले असे होते. तर आईचे नाव मनोरमा गोखले असे होते. विवाहापूर्वीचे त्यांचे नाव मंदाकिनी गोखले होते. त्यांना दोन बहिणी आणि एक बंधू होते. त्यांचा विवाह ११ मे १९५८ या दिवशी विक्रम सावरकर यांच्याशी झाल्यानंतर  सावरकर कुटुंबात स्वामिनी म्हणून त्यांचे आगमन झाले. तेव्हापासून सामाजिक कार्य, संपादन कार्य यासह विविध क्षेत्रात त्या स्वामिनी विक्रम सावरकर म्हणून ओळखल्या जात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा