उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी वापरलेली स्कॉप्रिओ एकच असल्याची माहिती समोर येत आहे. एपीआय सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक करताना याच स्कॉर्पिओ गाडीचा वापर केल्याचे समोर येत आहे. अर्णबला अटक करते वेळी या गाडीची नंबर प्लेट बदलली गेली होती अशीही माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. वाझे यांच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. रिपब्लिक समूहाचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करताना सचिन वाझे याने वापरलेली आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ एकच असल्याचे समजत आहे.
हे ही वाचा:
‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन
मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
४ नोव्हेंबर २०२० रोजी एपीआय सचिन वाझे याने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. २०१८ सालच्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकारणात अर्णब गोस्वामींना अटक झाली होती. आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अर्णब याला अटक करताना सचिन वाझे यांनी हीच स्कॉर्पिओ गाडी वापरली होती. त्यावेळी गाडीचा नंबर बदलण्यात आला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत असा दावा केला होता की सचिन वाझे आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची जुनी ओळख होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी देखील मनसुख हिरेन हे वाझेंच्या संपर्कात होते याला दुजोरा दिला होता. मनसुख यांची स्कॉर्पिओ गाडी चार महिने वाझेंच्या ताब्यात होती आणि वाझे ती वापरात होते असे देखील त्यांनी आपल्या जबाबात म्हटले होते.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्विट करत मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला आहे.
ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी जाताना सचिन वाझे यांनी मनसुख यांची स्कॉर्पिओ घेऊन गेले होते ही माहीती धक्कादायक आहे? पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची किती वाताहत झाली हे उघड करणारी ही बाब आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 14, 2021