26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाभयंकर !! किडनी रॅकेटचा उच्छाद, चौकशी समिती स्थापन करणार

भयंकर !! किडनी रॅकेटचा उच्छाद, चौकशी समिती स्थापन करणार

आरोग्य मंत्री तानाजी सावंतांची घोषणा

Google News Follow

Related

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी विधांनसभेत किडनी रॅकेटविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या रॅकेटमधील मुख्य आरोपी फरार असून ही एक संघटित  गुन्हेगारी आहे आणि या रॅकेटचे लोण आता संपूर्ण महाराष्ट्रांत पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले. किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली  शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात यासंदर्भात अहवाल देण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे.

धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये पन्नास टक्के सवलत किंवा मोफत सवलतीच्या दरांत अल्प उत्पन्न किंवा गरीब नागरिकांवर करण्यात येणारे उपचार यांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षक अधिकारी यांच्या मार्फत परीक्षण करून या रुग्णालयावर कारवाईची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह रुग्णालयातील आणखी सहा डॉक्टरांच्या विरोधात किडनी रॅकेट संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या रॅकेटमध्ये ज्या महिलेची किडनी काढण्यात आली होती, तिने यात बनावट कागदपत्रे तयार करून तिचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्यामुळे तिच्यावर पण गुन्हा दाखल कारणात आला आहे. या संपूर्ण प्रकरणांत पुणे पोलिसांनी एकूण १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सारिका सुतार नावाच्या महिलेने तिला फसवून तिची किडनी काढण्याचा आरोप केला असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

चौकशीमध्ये पोलिसांना सारिका सुतार या महिलेची फसवणूक करून १५ लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते. सारिका सुतार नावाची खोटी कागदपत्रे तयार करून त्यांना १५ लाख रुपये ना देता फक्त चार लाख रुपयेच देण्यात आले होते. म्हुणुन त्यांनी तक्रार दाखल केली ही फसवणूक रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापन अधिकारी सुद्धा यात सहभागी असल्याचे आढळले आहे. त्यानंतर पोलिसांनी सर्वांच्याच विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि याच प्रकरणी आता चौकशी समिती स्थापन करण्यांत आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा