22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामागोव्यातून औषाधांच्या नावाखाली बिअर आणि विदेशी दारू जप्त

गोव्यातून औषाधांच्या नावाखाली बिअर आणि विदेशी दारू जप्त

तळेगाव मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Google News Follow

Related

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने एरवी करत औषधाच्या नावाखाली गोव्यातून बिअर आणि विदेशी दारूची तस्करी करत   असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यांत आले आहे. या कारवाईत  राज्य   उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना ६५,९०,१६० रुपयांची दारूसुद्धा जप्त करण्यांत आली आहे. मावळ तालुक्यातल्या सोमाटणे पाठकर नायकजवळ हि कारवाई केली असून ४६ वर्षीय शंकरलाल नारायण जोशी राहणार बस्सी जिल्हा उदयपूर, राजस्थानच्या असलेल्या ट्रकचालकाला अटक करण्यांत आले आहे. त्यांच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात उत्पादन करण्यात आलेली विक्रीचा परवाना असलेली दारूची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे तळेगाव दाभाडे या विभागाच्या पथकाने सोमाटणे गावच्या परिसरांत संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एका संशयित कंटेनर ट्रकला अडवले. त्या ट्रकची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना गोव्यातून औषधांची वाहतूक करण्याच्या नावावर विविध प्रकारच्या दारू आणि बिअरची तस्करी चालली असल्याचे आढळले. या धाडीमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या विदेशी दारू, बिअरचे एकूण ८४५ खोके जप्त करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

एकूण ६५,९०,१६० रुपयांची दारू आणि बिअर तयार करून विक्रीसाठी जप्त करण्यात आली आहे.  वाहनासह हा सर्व मुद्दे माल ८६. १६ लाख रुपयांचा असून तो जप्त करण्यात आला आहे. पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजित सिंग राजपूत , उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेंचे निरीक्षक संजय सराफ , उपनिरीक्षक दीपक सुपे , प्रियांका राठोड आणि सहायक उपनिरीक्षक सागर धुर्वे, आर. सी. लोखंडे यांच्या पथकाने हि कारवाई केली असून जावं तात्याबा शिंदे , राहुल जंजाळ, आणि संजय गोरे यांनी हि कारवाई केली आहे.

सध्या काही दिवसापासून पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाई करण्याची मोहीम आखली आहे. शहरातल्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची नजर आहे. अवैध उद्योगांसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सापळा रचून कारवाई करतात. मागील काही दिवसांपासून अनधिकृत मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सर्वाधिक कारवाई हि धाबे आणि हॉटेलमध्ये परवाना नसताना दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात केल्याचे दिसून येत आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा