मुंबई सेंट्रल हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख भागात एसटी बसेस धावतात. सध्या याच मुख्य स्थानकाची स्थिती खूपच वाईट आहे. स्थानकाचे स्लॅब धोकादायक झाले असून त्याची बरीच पडझड होत आहे. स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पडायला लागले आहेत. प्रवासी जीव मूठीत घेऊन वावरत असतात. प्रवासी तिकडून जाण्यासही कचरतात इतकी वाईट स्थिती मुबई सेंट्रल स्थानकाची आहे. एसटी प्रशासनाला माणसाच्या जीवाची पर्वा नाही का, असे प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.
काल, गुरुवारी रात्री ११ वाजून ५ मीनिटांनी मुंबई सेट्रेल एसटी स्थानकातील स्लॅब कोसळून स्मिता चौधरी आणि त्यांचे सहकारी नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. त्याबाबत त्यांनी ट्वीट करून आपला रोष व्यक्त केला आहे.
त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, काल रात्री ११.०५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात मी सहकाऱ्याच्या आईला सोडण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकात गेलो होतो. एसटी वाट पाहत उभे असताना अचानक आवाज होऊन सिलिंग कोसळले. दोन सेकंदसाठी मी, आजी आणि माझे सहकारी यातून वाचलो.
मुंबई सेंट्रलसारख्या स्थानकाची ही अवस्था. मुंबई सेंट्रल स्थानकाची बरीच पडझड झाली आहे. स्थानकाचे भाग कोसळायला लागले आहेत. स्लॅब कोसळताहेत. काल जो स्लॅब कोसळला तो रात्रीच्या वेळेत पडल्यामुळे व सणवार व सुट्टीचे दिवस नसल्यामुळे प्रवासी संख्या कमी होती. त्यामुळे जीवीतहानी टळली. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर, जीवीतहानी झाल्यानंतर स्थानकाचे काम करणार का? एखादा स्लॅब कधीही प्रवाशांचा अंगावर पडून अपघात घडू शकतो. त्यावर ताबडतोब तोडगा काढून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. एसटीतील अधिकारी व प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य नाही का? मुंबई बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान
महिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा
मुंबई सेंट्रल स्थानकाप्रमाणेच जवळ जवळ शंभर स्थानकांची अशी अवस्था आहे. विद्याविहार विभागीय कार्यालय, वाशीतील स्टाफ क्वार्ट्स या बिल्डिंगचे रिपेअरिंग थांबलंय, स्थानकांचे नूतनीकरण थांबलेय, नवीन गाड्या घेण्यासाठी पैसे कमी पडताहेत. चिंचबंदर येथील स्टाफ क्वार्टर्सचे काम ताबडतोब करणे आवश्यक आहे, त्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होतेय. अनेक डेपोंच्या बिल्डिंग मोडकळीस आल्यात. त्या दुरुस्त करण्यासाठी एसटीकडे पैसे नाहीत.
आज शिंदे-फडणवीस यांचे भाजपा-शिवसेनेचे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक एक पाऊल पुढे टाकून त्यांना मदत करत आहेत. एसटीला गाळातून वर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करतेय. सर्वसामान्यांचे सरकार असणारे सरकार सध्या सत्तेत आहेत. ते नक्कीच एसटीच्या या समस्या जाणतील. प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या लालपरीला सुगीचे दिवस आणतील.