25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषमहिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!

महिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!

महामंडळाने गुरुवारी सर्व विभाग नियंत्रकांना सूचना

Google News Follow

Related

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधान भवनात राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. यात महिलांसाठीही विविध घोषणा करण्यात आल्या. यात एसटी बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येण्याची घोषणा केली गेली. त्याबाबत महामंडळाने गुरुवारी सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महिलांना आज, म्हणजेच १७ मार्चपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करता येणार आहे.

याआधी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने एसटीमधून मोफत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिक घेत आहे. एसटीसह शिवनेरी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवासाचा लाभ उठवत आहेत.

एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाइफ लाइन म्हणून तिची ओळख. ग्रामीण भागात प्रवासाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांना, कामगारापासून ते पर्यटकांना लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते तेही सुरक्षित.

हेही वाचा :

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कित्येक वर्ष भिजत घोंगडं होतं. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार महामंडळाला दर महिन्याला २२० कोटी देणार आहे. तसेच १०० कोटी रूपये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून मिळणार आहे.त्यामुळे एसटी कामगारांचे पगार आता १० तारखेच्या आत होण्यास मदत होणार आहे. त्यातच महिलांच्या सवलतीचाही भार सरकार उचलणार असल्याने महामंडळाला दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे एसटीत महिला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एसटी मंडळाच्या दररोज चालविण्यात येणाऱ्या सोळा हजाराहून अधिक फेऱ्यांद्वारे रोज लक्षावधी महिला प्रवास करतात. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत होत आहे. ज्या महिला नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढे महिला नक्कीच म्हणतील ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा