एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एपीआय सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला ठेवण्यात आलेली आहे.
सचिन वाझे यांच्यावर अटकेची तलवार आहे. जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट नमूद केले आहे, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे.” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. ज्याला कोर्टाने नकार दिला होता.
कोर्टाने सचिन वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?
एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर
सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
दुसरीकडे एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. म्हणूनच अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे कोर्टाने नमूद केले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला जात आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात पहिल्यांदाच सचिन वाझे यांचे स्टेटमेंट नोंदवले जात आहे. एनआयएकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन असलेल्या गाडीचा तपास केला जात आहे.