ब्रिटनमधील खलिस्तानवाद्यांच्या कारवाया संपलेल्या नाहीत. आता खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेन शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासाचे मुख्य गेट जबरदस्तीने बंद करण्याची घटना घडली आहे. ब्रिस्बेनच्या तारिंगा उपनगरातील स्वान रोडवरील भारतीय वाणिज्य दूतावास आहे. खलिस्तान समर्थक झेंडे, पोस्टर आणि बॅनर घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करता लोकांना वाणिज्य दूतावासात प्रवेश दिला नाही.
काही दिवसांपूर्वी खलिस्तानींनी ब्रिस्बेनमधील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले होते. त्याआधी मार्चच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरे आणि भारतीयांवर हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये खलिस्तान समर्थकांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्यानंतर खलिस्तान समर्थकांकडून ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाणिज्य दूतावासात कोणतेही काम होऊ शकले नाही. ऑस्ट्रेलियातील हिंदूंना धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचे हिंदू मानवाधिकार संचालक सारा गेट्स यांनी म्हटले आहे.
आंदोलक ब्रिस्बेनच्या शीख मंदिरातून बसमधून येथे आले ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेची चिंता आहे. खलिस्तानी समर्थक गोंधळ घालत होते त्यावेळी आपण स्वतः ती स्वतः घटनास्थळी उपस्थित असल्याचे सारा गेट्स यांनी म्हटले आहे. शिख फॉर जस्टिसने लक्ष्य केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वाणिज्य दूतावास आज बंद करणे भाग पडले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे सारा गेट्स यांनी सांगितले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे
‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…
राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?
तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?
ऑस्ट्रेलियातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या राजदूत अर्चना सिंग यांना घटनास्थळावरून खलिस्तानी ध्वज सापडला. त्यांनी तत्काळ क्वीन्सलँड पोलिसांना एव्ही माहिती दिली. अर्चना सिंह यांनी सांगितले की, आमचा पोलिस आणि अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन लोकांवर हल्ले होत होते, पण आता खलिस्तानी समर्थक भारत सरकारशी संबंधित संस्थांनाही लक्ष्य करत असल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे.
.