हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण वातावरण होते. सकाळी ७ वाजल्यानंतर मुंबई आणि परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामाने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा जोरदार तडाखा दिला होता. सूर्याचा पारा वर गेल्याने राज्याच्या अनेक भागात तापमानाचा उच्चांक झाला होता. फेब्रुवारीतील उन्हाच्या झळांनी काहिली केली होती. हिवाळा संपून उन्हाळ्याने आधीच कडक हजेरी लावली असे वाटत होते पण वातावरणाचा नूर अचानक बदलला.
कोरडी आणि दमट हवा एकत्र आल्यामुळे मुंबईत पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्री थंड अशा विषम हवामनाचा सामना मुंबईकरांना करावा लागत होता. हवामान खात्याच्या अंदाजनुसार अखेर गुरुवारी सकाळी पावसाने अवकाळी हजेरी लावली आहे.
हे ही वाचा:
अर्ध्या तिकिटावरून महिला कंडक्टवर गेल्या धावून
तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?
फडणवीसांनी ‘अजितदादां’ची केली कोंडी आणि मारली मुसंडी
संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.पश्चिम उपनगरात बोरिवली, दहिसर तर ठाणे जिल्ह्यात डोंबिवली, मुंब्रा, कळवा, बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. येणारे दोन तीन दिवस राज्यात पावसाचे असतील असे हवामान खात्याने म्हटले होते. त्यानुसार मुंबईत पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. घामानं लडबडलेल्या रुमालसारखी परिस्थितीत सध्या नाही. पण दिवसभराच्या उकाड्यातून मुंबई आणि उपनगरवासीयांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पण आता या पावसानंतर उकाड्यात किती वाढ होणार याची चिंता मुंबईकरांना आतापासून लागली आहे.