आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून हे तुकडे कपाटात ठेवून २३ वर्षांची मुलीने तीन महिने मृतदेहासोबत काढले. ही धक्कादायक घटना लालबाग परिसरात मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मुलीविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला असून तीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसानी या घरातून इलेक्ट्रिक कटर,कोयता आणि एक सुरा ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे लालबाग परिसर हादरला असून हे कृत्य एकटी मुलगी करू शकत नाही,यामध्ये आणखी आरोपी असावे अशी चर्चा परिसरात सुरू आहे. वीणा जैन (५५) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव असून रिम्पल (२३)ही मुलगी आहे. या दोघी लालबाग जंक्शन या ठिकाणी असलेल्या इब्राहिम कासम चाळीत पहिल्या मजल्यावर राहण्यास होत्या.
त्यांचे इतर नातेवाईक जवळच असणाऱ्या गुंडेचा गार्डन येथे राहण्यास आहे. तीन महिन्यापासून बहीण हिच्यासोबत बोलणे होत नसल्यामुळे जवळच राहणारा भाऊ सुरेश पोरवाल हा इब्राहिम कासम चाळीत मंगळवारी सायंकाळी आले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर भाची रिम्पल हिने दार उघडले असता घराची दुरवस्था बघून सुरेश यांना संशय आला, त्याने आई कुठे असा प्रश्न रिम्पलला केला असता आई कानपुरला गेली असे उत्तर तीने दिले. घरातील परिस्थिती व रिम्पलचा अवतार बघून रिम्पलने अनेक महिने आंघोळ केलेली नसल्याचे दिसून आले, सुरेश पोरवाल यांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून घेत रिम्पलला घेऊन काळाचौकी पोलीस ठाणे गाठून बहीण वीणा जैन हिची हरवल्याची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?
सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय
अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या
‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन
पोलिसांना देखील काहीसा संशय येताच पोलीस इब्राहिम कासम चाळीत दाखल झाले, घराची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी घरातील लोखंडी कपाट उघडताच एक उग्रदर्प सर्वत्र पसरला आणि कपाटातून एक प्लॅस्टिकची बॅग बाहेर पडली.
पोलिसांनी बॅग तपासली असता त्यात तुकड्यात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला, पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेऊन मृतदेह तपासला असता सदर मृतदेह वीणा शर्मा हीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीणा शर्मा हिचे २७ डिसेंबर रोजी भावासोबत शेवटचे बोलणे झाले होते, त्यानंतर ती कुणाच्याही संपर्कात आली नाही, प्रत्येक नातेवाईक रिम्पलला फोन करून दोघींच्या तब्येती बाबत चौकशी करीत असे, रिम्पल देखील त्यांना बरे असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळत होती.
पोलिसांना रिम्पल आणि वीणा राहत असलेल्या खोलीत एक कटर,कोयता आणि सूरा मिळून आला आहे, रिम्पलने कोयता आणि सुऱ्याने आई वीणाची हत्या करून कटरने मृतदेहाचे पाच तुकडे करून मृतदेह प्लस्टिक बॅगेत गुंडाळून कपाटात ठेवला होता अशी प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच रिम्पल हे एकटे करू शकते का किंवा तीला हे कृत्य करण्यासाठी कोणी मदत केली का याचा तपास पोलीस करीत असून रिम्पल चा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यातील कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया खाते तपासले जात आहे असल्याची माहिती पोलिसानी दिली.काळाचौकी पोलिसांनी रिम्पल विरोधात हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.