केंद्र सरकारने जवळपास ६,१५४ कार्यालयांची स्वच्छता केली असून या कार्यालयांमधील रद्दीच्या विक्रीतून केंद्राला तब्बल ६२.५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय १२.०१ लाख चौरस फूट जागासुद्धा यामुळे मोकळी झाल्याचे दिसत आहे. कार्यालयांमध्ये अनेक दिवसांपासून पडून असलेली रद्दी आणि भंगार साहित्य विक्रीस देऊन सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या टर्म मधेच ‘स्वच्छ भारत मोहीम’ राबवली होती. त्यातून त्यांनी नागरिकांना स्वच्छ भारतचे महत्व दाखवून दिले होते. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत हि माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने दोन ओक्टोबर २०२१ ते ३१ ओक्टोबर २०२१ या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात अली होती. या मोहिमेमध्ये केंद्र सरकारच्या ६१५४ पेक्षा अधिक कार्यालयांनी भाग घेतला होता. केंद्रीय मंत्रालये, त्यांचे विभाग आणि त्यांची संलग्न कार्यालयांमध्ये प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि स्वच्छतेचे भान राखण्यासाठी केंद्र सरकारने स्वछता मो हीम आखलेली होती. महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान रद्दी आणि भंगार सामानाची विल्हेवाट लावून महसूल मिळाल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?
सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय
अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या
‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन
दरम्यान, केंद्र सरकारने रद्दी विकून मोकळ्या झालेल्या जागेत आता विविध कामांसाठी उपयोगात आणणार असल्याचे सांगितले आहे. हि जागा १२.०१ चौरस फूट एवढी असून आता या जागेत उपहार गृह, परिषद, ग्रंथालये, बैठकीसाठी जागा, निरामय केंद्रे , पार्किंग अशा वेगवेगळ्या कामांसाठी वापरणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली आहे.