स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एमआयएम या कट्टर इस्लामी पक्षाशी युती केली आहे. अमरावती महापालिकेत हा प्रकार घडला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि एमआयएमने हातमिळवणी केली आहे.
अमरावती महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेना आणि एमआयएम हे दोन पक्ष एकत्र आलेले दिसले. अमरावती महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाजपाचे ४५ नगरसेवक असून एमआयएमचे १० तर शिवसेनेचे ७ नगरसेवक आहेत.
हे ही वाचा:
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण
बंगाल निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बंगाली नेत्याला काँग्रेसने हटवले
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या युतीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला लाचार असे संबोधत शिवसेनेने सत्तेसाठी पुन्हा एकदा हिंदुत्व सोडले असा घणाघात शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे.
लाचारी !
सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी अमरावती महापालिकेतही शिवसेनेने हिंदुत्व सोडले. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत AIMIM सोबत शिवसेनेने युती करून दाखवली. पुन्हा पुन्हा "हिंदुत्व" सोडून दाखवले. तोंडावर आपटले ही बाब वेगळी !@OfficeofUT @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra @BJP4India— Shivaray Kulkarni (@ShivarayK) March 12, 2021
या आधी शिवसेनेने सत्तेसाठी आणि भाजपाला शह देण्यासाठी वेळोवेळी राजकीय तडजोडी केल्याचे दिसून आले आहे. २०१९ विधानसभेनंतर उदयास आलेले महाविकास आघडीचे सरकार हे त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे.