27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाराज्यातील कैद्यांना आता 'तुुडुंब'वास; सगळ्या तुरुंगात गर्दी

राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी

वाढती संख्या ही चिंतेची बाब असून तुरुंग प्रशासनाला देखील नवीन कैद्यांना कुठे ठेवायचे असा प्रश्न पडला आहे.

Google News Follow

Related

राज्यातील तुरुंगाची क्षमता संपली असून अनेक तुरुंगात जनावरांप्रमाणे कैद्यांना कोंबण्यात येत असल्याची परिस्थिती राज्यतील अनेक तुरुंगात निर्माण झाली आहे. राज्यातील तुरुंगाची कैद्यांना ठेवण्याची वास्तविक क्षमता २४ हजार ७२२ इतकी आहे, मात्र सध्याच्या घडीला राज्यातील तुरुंगात दुपटीने म्हणजे कैद्यांची संख्या ४१,१९१ हजारावर गेली आहे. कैद्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून तुरुंग प्रशासनाला देखील नवीन कैद्यांना कुठे ठेवायचे असा प्रश्न पडला आहे.

महाराष्ट्रात मध्यवर्ती, जिल्हा, खुले आणि लहान मोठे असे एकूण ६० तुरुंग आहेत. त्यापैकी ९ मध्यवर्ती २६ जिल्हा आणि इतर खुले आणि छोटे असे आहेत. या सर्व तुरुंगापैकी पुण्यातील येरवडा, कोल्हापूर, नाशिक, तळोजा,नागपूर,औरंगाबाद आणि ठाणे मध्यवर्ती हे तुरुंग मोठे असून या तुरुंगाची कैद्यांची वास्तविक क्षमता इतर तुरुंगापेक्षा जास्त आहे.

राज्यातील या ६० तुरुंगाची वास्तविक क्षमता २४ हजार ७२२ इतकी आहे. परंतु सध्याच्या घडीला या तुरुंगामध्ये दुपटीने म्हणजे ४१हजार १९१ कैदी भरले गेले आहे.सर्वात जास्त कैदी येरवडा, मुंबईतील आर्थर रोड,ठाणे, कल्याण, अमरावती, नागपूर, तळोजा आणि भायखळा महिला तुरुंगात सर्वात अधिक म्हणजे तीन पटीने कैद्यांची भरणा करण्यात आली आहे.

अनेक कैद्यांना जामीन होऊन देखील जामीनदार किंवा तसेच जामिनासाठी पैसे नसल्यामुळे हे कैदी जामीन होऊनही कारागृहात खितपत पडलेले आहे, तसेच अनेक न्यायबंदीची न्यायालयीन सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळे हे न्यायबंदी देखील कारागृहात अनेक वर्षांपासून बंदी आहे, त्यात येणारे नवीन कैद्यामुळे कारागृहाची क्षमता केव्हाच संपली आहे.

हे ही वाचा:

अनंतनागमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त

भावाने केला बहिणीवर बलात्कार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

बॅरेक मध्ये या कैद्यांना जनावराप्रमाणे राहावे लागते, त्यात सामान्य कैद्यांना तर झोपण्यास जागा होत नसल्यामुळे प्रत्येक रात्र जागरण करून काढावी लागते, परिणामी त्यांना निद्रानाशचा त्रास होऊन त्याची प्रकृती बिघडत आहे. तसेच एकमेकांना चिटकून झोपण्यामुळे अनेकांना त्वचारोग व इतर विकार जडत आहे.आहे.अशीच परिस्थिती राहिली तर तुरुंगात राहण्यावरून, झोपण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी होऊन भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे आहेत सर्वाधिक कैदी असलेले तुरुंग :-

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती तुरुंगाची वास्तविक क्षमता २४४९ आहे, त्यात पुरुष कैदी २,३२३ आणी महिला कैदी १२६ एवढी असताना या तुरुंगात सध्याच्या घडीला ६,८२१ कैदी आहेत. त्यात महिला कैदी क्षमतेपेक्षा दुप्पट असून पुरुष कैदी क्षमतेपेक्षा तिप्पट संख्येने वाढले आहे.

मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगाची क्षमता ८०४ असून या तुरुंगात सध्या ३,६२९ कैदी आहेत. भायखळा पुरुष तुरुंगात – क्षमता २०० असून सध्या या ठिकाणी ४१५ कैदी आहेत.भायखळा महिला तुरुंग – क्षमता २६२ असून सध्या या ठिकाणी ३३३ महिला कैदी आहेत. तळोजा मध्यवर्ती तुरुंग – क्षमता २१२४ असून सध्या या ठिकाणी २८४८ कैदी आहेत.औरंगाबाद मध्यवर्ती तुरुंग -क्षमता १२१४ असून सध्या या ठिकाणी १६९२ कैदी आहेत.कोल्हापूर मध्यवर्ती तुरुंग – क्षमता १७८९ असून सध्या या ठिकाणी १९८२ कैदी आहेत.

नाशिक खुले तुरुंग क्षमता ५० सध्या १७५ कैदी आहेत.ठाणे मध्यवर्ती तुरुंग – क्षमता ११०५ असून सध्या या ठिकाणी ४३५६ कैदी आहेत. कल्याण जिल्हा आधारवाडी तुरुंग – क्षमता ५४० असून सध्या या ठिकाणी २०६१ कैदी आहेत.नागपूर मध्यवर्ती -क्षमता १८४० असून सध्या या ठिकाणी २९३७ कैदी आहेत. अमरावती मध्यवर्ती – क्षमता ९७३ असून सध्या या ठिकाणी १४५० कैदी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा