जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलीस आणि लष्कराने मोठी कामगिरी केली आहे. रविवारी रात्री केलेल्या एक विशेष शोध मोहीम कारवाईमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळाचा पर्दाफाश केला आहे. यावेळी अनंतनाग पोलिस आणि लष्कराने घेतलेल्या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे ठिकाण दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील राख मोमीन भागात आहे. या भागात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाच्या शोधात या दहशतवादी संघटनेने वापरलेले सक्रिय लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले आहे.
दहशतवाद्यांच्या ठिकाणाबाबत रविवार रात्री एक विशेष माहिती मिळाली होती . त्या दिशेने केलेल्या कारवाईमध्ये अनंतनाग पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने राख मोमीन परिसरात शोधमोहीम राबवली. शोध मोहिमेमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी आयईडी, ३ पिस्तूल, ६ डिटोनेटर, पाच पिस्तूल मॅगझिन,४ रिमोट कंट्रोल आणि १३ बॅटऱ्यांचा हस्तगत केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :
सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!
ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून
नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर
दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
याआधी शनिवारी देखील जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर धड टाकली होती होते. त्यावेळी शालनार हंगनीकूट परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजर येथून लष्कर-ए-तैयबा च्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली होती. प्रसिद्धीपत्रकानुसार, पोलिसांनी या दोघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे