25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषशरद पवार म्हणाले होते, मुंबईत १२ नाही १३ बॉम्बस्फोट झाले!

शरद पवार म्हणाले होते, मुंबईत १२ नाही १३ बॉम्बस्फोट झाले!

१२ मार्च १९९३ला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुस्लिम लांगूलचालनाची संधी साधली

Google News Follow

Related

एकामागून एक होत असलेल्या बॉम्बस्फोटांनी प्रत्येक मुंबईकरांच्या पायाखालची वाळू सरकत होती. त्यातच अफवांमुळे जीव खालीवर होत होता. अशातच मुंबईत १२ नाही तर १३ बॉम्बस्फोट झाले असल्याचे जाहीर करण्यात आले. बरं ही घोषणा राजकीय क्षेत्रातील एका अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याने केली असल्यामुळे ती अफवा आहे, असेही म्हणता येत नव्हते. पण शेवटी ही अफवाच होती. असे का केले हे या नेत्याने बॉम्बस्फोटाच्या २२ वर्षानंतर उलगडून सांगितले.

१९९३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट हे भारतात आरडीएक्सचा वापर करण्यात आलेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता. २६/११ प्रमाणे हे हल्ले देखील पूर्वनियोजित होते. मुंबई स्टॉक एक्सचेंज, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, एअर इंडिया बिल्डिंग, सेंचुरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाझा सिनेमा, जुहू सेंटॉर हॉटेल, सहार विमानतळ आणि एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल ही ठिकाणे लक्ष्य करण्यात आली. वास्तविक यातील एकही स्फोट मुस्लिम बहुल विभागात झाला नव्हता . कारण या स्फोटाचे सूत्रधार होते ते दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन. त्याचा संपूर्ण कट पाकिस्तानमध्ये रचला गेला होता.

हे ही वाचा:

अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान त्यावेळेस मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी असे काही केलं ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. मुंबईत १३ वा बॉम्बस्फोट मस्जिद बंदर येथे झाला, असे शरद पवार यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री असे म्हणतात तर मग त्यावर कोणीही विश्वास ठेवणार पण प्रत्यक्षात तसे झाले नव्हते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर त्यांनी एक अतिरिक्त बॉम्बस्फोट ‘शोधला’ जो प्रत्यक्षात घडलाच नव्हता. कथित जातीय सलोखा राखण्यासाठी पवार खोटे बोलले. मुस्लिम समाजालाही याची झळ बसली हे दाखवण्यासाठी बॉम्बस्फोटांची संख्याही वाढवली होती. शरद पवार यांनी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर २२ वर्षांनी एका मुलाखतीमध्ये हे गुपित उघड केलं होते.कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा पवार यांनी तुष्टीकरणाला प्राधान्य दिले. पवार यांच्या या विधानानंतर त्यावेळी खूप मोठी टीकाही झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा