27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणमुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यानंतर भावनेला महापूर

मुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यानंतर भावनेला महापूर

समर्थकांचा मुश्रीफ यांच्या घराबाहेर आंदोलन आणि गोंधळ

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानंतर तिथे भावनेचा महापूर लोटला आहे. आपल्या नेत्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तिथे मुश्रीफ यांचे समर्थक गोळा झाले असून त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

एका समर्थकाने चक्क आपले डोके फोडून घेत या छापेमारीचा निषेध केला. रक्ताळलेल्या चेहऱ्याने हा समर्थक आंदोलनात सहभागी झाला होता. त्या माध्यमातून वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनीही आपल्या पतीविरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर टाहो फोडला. घराच्या गेटसमोर येत त्यांनी आम्हाला आता गोळ्या घाला अशी मागणी करत आम्हाला त्रास दिला जात असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

कांदिवलीच्या समतानगर ‘एकदुजे के लिए’; प्रेमी युुगुलाने उचलले हे पाऊल

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जा, उच्च न्यायालयाने काढली याचिका निकाली

सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद, दिल्ली पोलिसांना फार्म हाऊसमध्ये ही गोष्ट सापडली

मुश्रीफ तासनतास काम करता पण त्यांच्यावर मग ही कारवाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मुश्रीफ हे अधिवेशनासाठी गेलेले असल्यामुळे ते घरी नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीत कशी काय ईडीने कारवाई केली असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यांच्या घरात छोटी मुले आहेत, त्यांना ताप आला आहे. महिला आहेत मग ईडीचे अधिकारी घरात कसा काय प्रवेश करतात, असा सवालही समर्थकांनी विचारला आहे.

एक समर्थकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अशी कारवाई करताना ती कशासाठी केली आहे, काय कारण आहे, आम्हाला त्याचा अहवाल मिळाला पाहिजे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. समर्थकांना आवरण्याचा ते प्रयत्न करत आहेत. समर्थकांनी मात्र जोपर्यंत ही ईडीची कारवाई सुरू आहे, तोपर्यंत आपण तिथून हलणार नाही, असे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा