27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाकांदिवलीच्या समतानगर 'एकदुजे के लिए'; प्रेमी युुगुलाने उचलले हे पाऊल

कांदिवलीच्या समतानगर ‘एकदुजे के लिए’; प्रेमी युुगुलाने उचलले हे पाऊल

पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला.

Google News Follow

Related

मुंबईतील समतानगरमध्ये एका प्रेमी युगुलाने असे काही केले की, सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या प्रेमाला विरोध होत असल्यामुळे त्यांनी शेवटी टोकाचा निर्णय घेतला. पण त्यामुळे कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.

मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या प्रेम प्रकरणाला घरातल्यांचा विरोध असल्यानेच दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील मृत तरुणीही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कांदिवली पूर्व जानुपाडा परिसरात मृत तरुण आकाश जाठे (२१) हा रहात असून तो घरकाम करायचा. त्याच्या शेजारीत मृत अल्पवयीन तरुणी रहात होती. मागील अनेक दिवसांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र त्यांच्या या नात्याला घरातल्यांचाविरोध होता. दरम्यान शुक्रवारी पहाटे पीडित तरुणी घरी नसल्याचे पाहून घरातले तिचा शोध घेत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. मुलीने तिचा मोबाइल घरीच ठेवला होता. त्यामुळे संशियत व्यक्ती मुलाबाबत चौकशी केली असता. तोही घरातून निघून गेल्याचे कळाले.

हे ही वाचा:

फ्लूने घेतले दोन बळी; भारतात कर्नाटक आणि हरियाणात नोंद

सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद, दिल्ली पोलिसांना फार्म हाऊसमध्ये ही गोष्ट सापडली

थर्ड गिअर..२.९२ लाख कार्सची विक्री

वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जा, उच्च न्यायालयाने काढली याचिका निकाली

मुलाचा मोबाइल लोकेशन काढले असता. तोही पाठाचे पाणी या आदिवासी पाडाजवळ असलेल्या खदानी परिसरात दाखवत असल्याने पोलिसांनी तिथे शोध मोहिम राबवली. त्यावेळी दोघांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. मुलाच्या मोबाइलमध्ये त्याने आईला पाठवलेले मेसेज पोलिसांनी पाहिले. त्यात ‘आम्ही जात आहोत, परत येणार नाही. काळजी घ्या’ असा मेसेज होता. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी समतानगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा