प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे नुकतेच निधन झाले पण दिल्ली पोलिसांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण केवळ मृत्यूचे नाही हे स्पष्ट झाले होते. आता दिल्ली पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यात त्यांना काही संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत.
ज्या ठिकाणी फार्म हाऊसमध्ये त्या दिवशी पार्टी झाली होती तिथे पोलिसांना काही औषधाच्या गोळ्या सापडल्या आहेत. या पार्टीनंतर कौशिक यांचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, कौशिक यांच्या विस्तृत पोस्टमॉर्टेम अहवालाची ते प्रतीक्षा करत आहेत. नैऋत्य दिल्लीतील या फार्म हाऊसची तपासणी पोलिसांनी केली आहे. तिथे त्यांना काही औषधे मिळाली आहेत.
हे ही वाचा:
थर्ड गिअर..२.९२ लाख कार्सची विक्री
साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच
काय सांगता ? फाईव्ह डेज नाही… फॉर डेज वीक ?
…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील एक उद्योगपतीही या पार्टीत सहभागी झाला होता त्याचाही शोध घेतला जात आहे. त्या पार्टीत कोण कोण सहभागी झाले होते त्यांची यादीही तपासली जाणार आहे.
कौशिक यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली झालेल्या या मृत्यूमुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली. ६६ वर्षीय कौशिक यांनी अनेक चित्रपटांतून आपल्या हरहुन्नरी कलेचे दर्शन घडविले होते. चार दशकांच्या आपल्या या कारकीर्दीत कौशिक यांनी अनेकविध भूमिका साकारल्या. त्यातील मिस्टर इंडियामधील कॅलेंडर ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. मराठी चित्रपट लालबाग परळमध्येही त्यांनी भूमिका केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून दिले होते.