कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्रात ‘फाईव्ह डेज वीक’ म्हणजेच पाच दिवसांचा आठवडा जवळपास आता सर्व कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडला आहे. पण समजा आठवडा फॉर डेज विकचा झाला तर .. नाही नाही अजून त्याबद्दल काही निर्णय झालेला नाही. पण या नुसत्या विचारानेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पण कदाचित असे होऊही शकते.. कसे ते जाणून घ्या ..
कॉर्पोरेट क्षेत्रात एका दिवसात अनेक तासांचे काम तेही पाच किंवा सहा तासात केले जात आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? कि जगातील काही देशांमध्ये आता तर ४ दिवस काम आणि ३ दिवसांची सुट्टी अशी चर्चा सुरु झाली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ४ दिवस काम आणि ३ दिवसांची सुट्टी झाल्या मानसिक आरोग्य तर सुधारेलच शिवाय ग्लोबल वॉर्मिंगही कमी होईलअसे म्हटले जात आहे.
इतकेच कशाला ब्रिटनमध्ये तर याचा एक प्रयोगही करून बघण्यात आला आहे. ब्रिटनमधील ७० कंपन्यांनी गेल्या वर्षात हा प्रयोग केला आहे. या प्रयोगाचा भाग म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करण्यासाठी बोलावण्यात आले .फॉर डेज विकीच्या या जवळपास ६ महिन्यांच्या चाचणी दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत २२ टक्के सुधारणा झाली असल्याचे दिसून आले आहे. या चाचणीच्या नंतर अनेक कंपन्यांनी आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा सराव असाच पुढे चालू ठेवण्याचा विचार केला आहे. बेल्जियम, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही अशाच प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. या देशातही साधारणपणे असेच परिणाम दिसून आले आहे.
हे ही वाचा:
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन
नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती
अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार
‘फॉर डेज वीक’ मुळे हा झाला फायदा
प्लॅटफॉर्म लंडन या पर्यावरण संस्थेच्या मदतीने हा प्रयोग करण्यात आला. संपूर्ण ब्रिटनमध्ये आठवड्यातून ४ दिवस काम करण्याचा नियम बनवला गेला तर २०२५ पर्यंत कार्बन उत्सर्जन २०टक्क्यांपेक्षा जास्त कमी होईल. वाहनांची वर्दळही कमी होईल . त्यामुळेही कारबन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. फॉर डेज वीक मुळे लोक अधिक आनंदी होतील, ते त्यांच्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकतील. त्यांचे आवडते काम देखील करू शकतील. आठवड्यातून चार दिवस काम करून ग्लोबल वॉर्मिंग बर्याच प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकेल असेही म्हटल्या जात आहे.
भारतातही सुरु आहे विचार
भारतातही ‘फॉर डेज वीक’ चा विचार करण्यात येत आहे. कामाचे तास वाढवून दिवस कमी करण्याची चर्चा आहे. कामगार कायद्यानुसार हे करता येते. लोकांना ८ किंवा ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागले तर त्या बदल्यात ते तीन दिवस सुट्टी घेऊ शकतात. यावर अद्याप चर्चा सुरू असली तरी सर्व कंपन्या त्यावर सहमत होतील याची खात्री देता येत नाही असे सांगण्यात येत आहे.