भारतात इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे दोघांचा बळी गेला आहे. पहिला मृत्यू हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील असून दुसरा मृत्यू हा हरियाणा मध्ये झाला आहे. आत्तापर्यंत भारतात एच थ्री एन टू या इन्फ्लुएंझा विषाणूमुळे ९० तर एच वन एच वन या विषाणूची आठ प्रकरणाची नोंद झाली आहे. सध्या भारतात एच थ्री एन टू या इन्फ्लुएंझा विषाणू भरपूर प्रमाणात पसरत आहे. या विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील अलूर तालुक्यातील ८२ वर्षीय व्यक्तीला २४ फेब्रुवारीला हसन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये दाखल करण्यात आले होते.
Influenza A subtype H3N2 is the major cause of current respiratory illness. ICMR-DHR established pan respiratory virus surveillance across 30 VRDLs. Surveillance dashboard is accessible at https://t.co/Rx3eKefgFf@mansukhmandviya @DrBharatippawar @MoHFW_INDIA @DeptHealthRes pic.twitter.com/3ciCgsxFh0
— ICMR (@ICMRDELHI) March 3, 2023
त्यानंतर एक मार्चला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास होता. याशिवाय हरियाणात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून तापाच्या रुग्णामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामधील बहुतेक रुग्ण हे एच थ्री एन टू या इन्फ्लुएंझा विषाणूचे रुग्ण आहेत. या विषाणूला ‘हॉंगकॉंग फ्लू’ या नावानेही ओळखले जाते. हा विषाणू भारतात अधिक शक्तिशाली असल्याचे सध्या चित्र आहे. भारतामध्ये फक्त एच थ्री एन टू या इन्फ्लुएंझा विषाणू आणि एच वन एन वन हे संक्रमित रुग्ण मिळाले आहेत.
या दोन्ही विषाणूंची लक्षणे हि कोरोना विषाणू व्हायरस सारखीच आहेत. सध्या जगभरात परत एकदा फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ताप, खोकला, आणि वाहणारे नाक याशिवाय शरीरदुखी, उलटी, जुलाब आणि मळमळ हि एच थ्री एन टू या विषाणूची प्रमुख लक्षणे आहेत.
हे ही वाचा:
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन
नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती
अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार
करा स्वतःच फ्लू पासून संरक्षण
एच थ्री एन टू या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सारखे हात धुणे, मास्क घालणे, आणि ठराविक अंतर ठेवण्याचा सल्ला सध्या डॉक्टर देत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने या व्हायरस तापाला हंगामी ताप म्हंटले आहे. हा विषाणू पाच ते आठ दिवस टिकतो याशिवाय आयएमएने अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला दिला आहे. फ्लूवरील लस नक्की घ्या. हात नियमितपणे धुवा. सारखे हात साबणाने स्वच्छ धुवा आणि शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळा. या गोष्टीपण आवश्यक असल्याचे सांगितले आहे.