28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरअर्थजगततब्बल ३६,००० कोटींचा डोस.. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

तब्बल ३६,००० कोटींचा डोस.. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

रस्ते, विमानतळ, मेट्रो प्रकल्प, घरकुल योजनांची घोषणा

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचा २०२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, गुरुवारी आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रस्तावित केलेल्या ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलियन डॉलर असेल. त्यादृष्टीने केलेल्या वाटचालीचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडलेले दिसून येत आहे. रेल्वे, विमानतळ, मेट्रो , बस या आणि अन्य प्रकल्पांसाठी अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून भरपूर निधी देण्यात आला आहे.

मुंबई, एमएमआर आणि ठाणे परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे फडणवीस म्हणाले. ३३७ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क विकसित केले जात असून ४६ किमीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये आणखी ५० किमी लांबीचे काम सुरू होईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ४० किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने मान्यता दिली असून एकूण ४३.८० किमीचे काम सुरू आहे. विदर्भातील पैनगंगा-नलगोणा प्रकल्पाला सर्व मंजुरी देण्यात येणार असून त्यासाठी विशेष अर्थसंकल्प लवकरच जाहीर केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.  ठाणे, नाशिक, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली असून ते केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विविध शहरातून हवाई झेप

शिर्डी विमानतळावर नवीन पॅसेंजर टर्मिनलसाठी सरकारने ५२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराची घोषणाही सरकारने केली आहे. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. छत्रपती संभाजी नगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटींची तरतूद केली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी, पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी१०० कोटी रुपये देण्यात आलेले आहे. बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रकल्पांना आधुनिकीकरणाची जोड

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेजसाठी ४५२ कोटी रुपये, नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांसाठी ५० टक्के राज्य हिस्सा देणार देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी २५ नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत .

हे ही वाचा:

स्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार

महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार

अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…

१०० वर्षे जुन्या मुंबईच्या प्रवेशद्वाराला ‘तडे’

मेट्रो धावणार शहरा शहरात

मुंबईत ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे असून ४६ कि.मी. खुला आहे आणखी ५० कि.मी. यावर्षी खुला होणार. मुंबई मेट्रो १० अंतर्गत गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोडसाठी ४,४७६ कोटी रुपये, मुंबई मेट्रो ११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज ८,७३९ कोटी रुपये, मुंबई मेट्रो १२ : कल्याण ते तळोजा ५,८६५ कोटी रुपये, नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा ६,७०८ कोटी रुपये, पुणे मेट्रोची ८,३१३ कोटीं रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो या अन्य नवीन प्रकल्पांचा उल्लेख फडणवीस यांनी केला. कल्याण ते तळोजा मेट्रो एमएमआ साठी ३३७ किमी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा भाग म्हणून बांधली जाईल असे ते म्हणाले .

जाणून घ्या अन्य पायाभूत प्रकल्प :

नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार
मुंबईत युनिटी मॉल उभारणार
चार लाख नवीन घरे बांधणार, दीड लाख मागासवर्गीयांसाठी आणि २५ हजार मातंग समाजासाठी
मोदी आवास घरकुल योजना १२,०० कोटी रुपयांच्या खर्चासह सुरू करणार
मुंबई फिल्मसिटीच्या सुधारणेसाठी ११५ कोटी रुपये राखीव
मुंबई रेडिओ क्लबजवळ बांधण्यात येणाऱ्या मरीनासाठी १६२ कोटी रुपये
नागपुरात नवीन मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब: १,००० कोटी रुपये
नागपूर, मुंबई, पुणे, स्मभाजी नगर , रत्नागिरी वर्तुळाकार इकॉनॉमी पार्क उभारणार
सार्वजनिक बांधकाम विभाग ४,५०० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करणार: ३००० कोटी रुपयांची तरतूद

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा