28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरधर्म संस्कृतीआनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण "होळी"

आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”

जाणून घेऊया विविध राज्यात कशी होळी साजरी करतात.

Google News Follow

Related

आपल्या भारत देशात प्रत्येक  मराठी  महिन्याचे वेगवेगळे सण आहेत. आपल्याकडच्या सण आणि परंपरा यांना निसर्गाची सांगड घातलेली बघायला मिळेल.  असो पण आज आपण बघणार आहोत येणाऱ्या होळी या सणाविषयी. अगदी लहानांपासून ते आबालवृद्ध हा रंगांनी भरलेला होळी  सण खूपच आनंदाने साजरा करतात. यात खेळाच्या आनंदाची मजा तर घेता येतेच पण छान पुरणपोळी पण खाता येते. हिंदू सणांत होळी खेळण्याची अगदी फार पूर्वीपासून एक अनोखी परंपरा आहे.

आज आपण बघूया आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये होळी ‘कुठल्या राज्यात  कशा प्रकारे खेळली जाते’ ते. होळी हा दोन दिवसांचा सण असून पहिल्या दिवशी होलिका दहन असते, तर दुसऱ्या दिवशी आपण एकमेकांना रंग लावून सगळे राग लोभ विसरून ” बुरा ना मानो होली है ” म्हणत एकमेकांना रंग लावतो हा, पण कुठले बाहेरचे रंग न लावता नैसर्गिकच रंग लावावेत.  ज्यामुळे कोणाला हानी पोचू नये हा मुख्य उद्देश.

फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळी हा सण आपण गुलाल, फुले आणि रंगीबेरंगी पाणी एकमेकांवर उडवतात. आणि आपल्या कुटुंबीयांबरोबर  साजरा करतात. आता बघूया प्रत्येक राज्यांत हा सण कसा साजरा करतात. पहिले बघूया आपल्या ‘महाराष्ट्रांत’  कसा साजरा करतात ते. “वाईटावर चांगल्याचा विजय”   याचे प्रतीक म्हणून आदल्या दिवशी लाकडे गोळा करून त्याची होळी बनवून तिचे ‘होलिका दहन’ करतात. सुरवातीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून होळीमध्ये एक नारळ टाकण्याची प्रथा आहे. जसे होळी मध्ये सगळे वाईट जळून त्याची राख होते आणि नवीन चांगल्याची सुरवात होते तसेच, आपल्या मनातील सगळे राग,नकारात्मकता या होळीत टाकून एक नवीन सुरवात करावी. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग ,गुलाल एकमेकांना लावून आपल्या आप्तजनांबरोबर हा आनंद साजरा करून दिगुणीत करूया.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

महाराष्ट्राच्या बाजूचा प्रदेश म्हणजे गोवा इथे होळी  मोठ्या प्रमाणांत साजरी करतात.गोव्यात होळीचा सण हा होलिका दहनानंतर पाच दिवस म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी साजरा करतात. याच रंगांच्या उत्सवाला स्थानिक लोक ‘शिमगो’ असे म्हणतात. याशिवाय शिमगो किंवा शिमगा असे सुद्धा म्हणतात.  उत्तर भारतात होळी हा सण विशेष उत्साहाने साजरा करतात. होळीचा हा सण खास बघण्यासाठी वज्र, वृंदावन, आणि गोकुळात जातात. याशिवाय इथे बरेच दिवस होळी साजरी करण्याची पद्धत आहे. वज्र मध्ये पुरुष महिलांना रंग लावतात, तर महिला त्यांना काठीने मारण्याची प्रथा आहे.

उत्तर भारतातील होळी आणखी एका कारणाने विशेष आहे कारण, इथे फुलांची होळी खेळली जाते आणि हि फुलांची होळी खास बघण्यासाठी दूरदूरहून दरवर्षी लोक येतात. पंजाब राज्यात होळी हि ‘होला मोहोल्ला’ म्हणून साजरा करतात. ‘होला मोहोल्ला’ म्हणजे हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे. आनंदपूर साहिब येथे हा सण सहा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळेस घोड्यावर  स्वार  होऊन हातात तलवारी दाखवत वीरता , शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक दाखवतात. या पद्धतीची होळी हि गुरु गोविंदसिंह यांच्या काळात सुरु करण्यात आली होती. उदयपूर , राजस्थानमध्ये होळी साजरी करणे म्हणजे मथुरा आणि वृंदावन पेक्षा अजिबात कमी नाही उदयपूरमध्ये तर अत्यंत शाही पद्धतीने होळी साजरी करण्याची प्रथा आहे. इकडे सर्व राजघराणे उत्साहाने सर्व सण साजरे करत असतात.

होलिका दहनाच्या विधीपासून ते रंग उडवणाऱ्या सर्व प्रथा पाळत होळी उत्साहाने साजरी करतात. याशिवाय सजवलेले शाही घोडे आणि बँडसह मिरवणूक निघते आणि होलिकेच्या पुतळ्याला अग्नी लावला जातो. आता बघूया दक्षिण भारतातील होळी कशी साजरी करतात ते.  बघूया कर्नाटकातील हम्पी या शहरांत होळीचा सण अनोख्या पद्धतीने दोन दिवस साजरा करतात. हम्पीच्या ऐतिहासिक रस्त्यांवर ढोलताशांमध्ये मिरवणूका  काढल्या जातात. यामध्ये लोक आनंदाने गात, नाचत, मनसोक्त होळी खेळतात आणि रंग उडवतात.

स्थानिक लोक आणि सर्व लोक रंग खेळल्यानंतर तुंगभद्रा नदी आणि तिच्या उपनद्यांवर स्नान करण्यासाठी जातात. तर केरळ राज्यात मांजलकुळी हा कुडु बी आणि कोकणी समाजाचा सण आहे. यामध्ये शांततेत लोक हळद लावलेले जलरंग वापरून स्थानिक मंदिरांमध्ये भेट देतात. अशा प्रकारे आपल्या देशाच्या या काही प्रमुख राज्यात होळीचा सण साजरा करतात. तेव्हा सुरक्षित आणि आनंदाने हा सण साजरा करून सणाचा आनंद द्विगुणित करूया.  तेव्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. या होळीच्या सगळ्या रंगांप्रमाणे तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग नेहमी येऊ देत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा