ठाकरे गटाची सध्या ‘बुडत्याचे पाय खोलात’ अशी स्थिती झाली आहे.संजय राऊत, अनिल परब यांच्या नंतर आता ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योगेश भोईर यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या टीमने भोईर यांच्या घरी छापेमारी केली असल्याची माहिती आहे. भोईर यांनी ८५ लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
या संदर्भातच भोईर यांच्या घरी छापामारी करण्यात आली आहे. कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक आणि मागाठाणेचे उपविभाग प्रमुख असलेल्या योगेश भोईर यांच्यावर याआधीही खंडणीचे आरोप आहेत. योगेश भोईर यांच्यावर एस. डी. कॉर्प. कंपनीकडून २५ लाख रुपयांची खंडणी मांगितल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिन्यांपूर्वीच भोईर यांना खंडणीच्या आरोपांखाली अटक केली होती,पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जेलमधून सुटका झाली होती.
हे ही वाचा:
औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा
तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा
बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत
दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव
आता योगेश भोईर यांची मालमत्तेमुळे अडचण वाढली आहे.आपल्या ज्ञात मिळकतीच्या ४४१ टक्के अपसंपदा जमवल्याचा योगेश भोईर यांच्यावर आरोप आहे. आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ८५, ५६, ५६२ म्हणजेच ४४९.१३ टक्के अपसंपदा संपादित केल्याचा त्यांच्यावरआरोप आहे.