27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणऔरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणार पत्र

Google News Follow

Related

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे औरंगजेबाची कबर हैदराबाद मध्ये नेऊन टाका असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद असेल तर ती कंबर काढा या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

औरंगजेब येथे येऊन गेलेला असला तरी त्याचा शहराशी काही संबंध नव्हता. औरंगजेब नगरला मेला मग त्याला इकडे कशाला आणून टाकला. या शहराची शांतता बिघडू नये. हि शांतता बिघडवण्याचा काम इम्तियाज जलील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. असा आरोप करत आपण पोलीस कंमिशनर यांचीही भेट घेणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. त्याला एमआयएमने विरोध केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे नाव बदलून औरंगाबाद करावे, या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जलील यांच्या उपोषणावरून देखीळ शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे. बिर्याणी खाऊन लोकांच्या भावना भडकवण्याचे कामी इम्तियाज जलील आणि त्यांचे सहकारी करीत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचे आंदोलन बंद करण्यासाठी पोलिसांकडे मागणी करणार असल्याचे देखील शिरसाट यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले

होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा

‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’

ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

निषेध नाहीस्वतः चे राजकारण करायचे आहे
इम्तियाज जलील यांचे आंदोलन कुठे सुरू आहे त्यांची बिर्याणी पार्टी सुरू आहे. इस्लामची त्यांना जर खरंच जाण असेल तर त्यांनी अन्नाची शपथ घेऊन सांगावं की आम्ही तिथे बिर्याणी खात नव्हतो. इम्तियाज जलील आणि त्यांचे सहकारी पेंडॉलमध्ये बसून बिर्याणी खात आहेत माझ्याकडे फोटो आहेत. जलील यांचा निषेध वगैरे काही नाही त्यांना स्वतः चे राजकारण करायचे आहे .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा