मुंबईकरांना आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस गाडीची भेट मिळू शकते. मुंबई – गोवा मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी नुकत्याच दोन वंदे भारत गाड्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आता ही तिसरी भेट असेल आणि देशातील ११ वि वंदे भारत गाडी असेल,. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला वंदे भारत सेमी-हायस्पीड एक्स्प्रेस ट्रेन लवकरच मुंबई-गोवा मार्गावर धावणार असल्याची माहिती दिली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. आमदारांच्या एका शिष्टमंडळाने रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी शिष्टमंडळाला मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे सांगितले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रे धावणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यात आले असून तपासणीनंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी शिष्टमंडळाशी बोलतांना सांगितले .
सध्या मुंबईला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जासंत आहेत. यामध्ये गांधीनगर कॅपिटल-मुंबई सेंट्रल, मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. आता गोवा-मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस गाडी सुरू झाली, तर यानंतर मुंबईत दिल्लीपेक्षा वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जास्त असतील असे म्हटल्या जात आहे. दिल्ली जवळ नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नवी दिल्ली-अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस आहेत.