दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सिसोदिया यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी सिसोदिया याना ६ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायालय १० मार्च रोजी निर्णय देणार आहे.
शनिवारी सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयने कोर्टाकडे तीन दिवसांची कोठडी मागितली होती. सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. रिमांडची मुदत ४ मार्च रोजी संपली. विशेष सीबीआय न्यायालयात मनीष सिसोदिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दयानकृष्णन आणि सिद्धार्थ अग्रवाल यांनी हजेरी लावली. सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
आतापर्यंत किती तास चौकशी झाली, अशी विचारणा न्यायालयाने सीबीआयकडे केली याला उत्तर देताना सीबीआयने म्हटले की, सिसोदिया अजूनही सहकार्य करत नाहीत. मनीष सिसोदिया हे आतापर्यंत काही अधिकाऱ्यांशी समोरासमोर आले आहेत. मनीष सिसोदिया यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे वेळ गेला. वेगवेगळ्या साक्षीदारांना सामोरे जावे लागेल, असे सीबीआयने सांगितले. तपासासाठी आवश्यक असलेली काही कागदपत्रे गहाळ असल्याचेहि सीबीआयने सांगितले.
तुम्हाला कोठडीत काही अडचण आहे का? असे सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के नागपाल यांनी सुनावणीदरम्यान सिसोदिया यांना विचारले, याला उत्तर देताना सिसोदिया म्हणाले की, मला शारीरिकदृष्ट्या कोणतीही समस्या नाही. जेवणही वेळेवर मिळते, पण अधिकारी मला तोच प्रश्न वारंवार विचारतात. त्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. या छळातून मला वाचवा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्यायालयाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.