सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. हे वाचा आणि खरेदी करण्यासाठी जा. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना शुद्धतेची हमी देणाऱ्या हॉलमार्किंगबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता ३१ मार्च २०२३नंतर सोन्याचे दागिन्यांवर ६ अंकी कोड असलेल्या हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही . ग्राहक हिताच्या दृष्टीने ग्राहक व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३१ मार्च नंतर हॉलमार्क नसलेले सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार नाही.
नवीन नियम लागू झाल्यावर १ एप्रिल २०२३ पासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. यासोबतच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सोने खरेदी विक्रीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता . मात्र ते फक्त दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनिवार्य करण्यात आले होते. छोट्या शहरांमध्ये हॉलमार्किंग सेंटर सुविधा नसल्याचे कारण त्यावेळी सोने व्यावसायिकांनी दिले होते. त्यामुळे सरकारने त्यांना थोडीफार मुभा दिली होती . मात्र आता पुरेशा प्रमाणात गोल्ड हॉलमार्क केंद्रे तयार झाल्यानंतर ते संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आले आहे. यापूर्वी सोन्याच्या व्यापाऱ्यांनी जुन्या दागिन्यांचा साठा असल्याचा युक्तिवादही केला होता.
हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर, देशात फक्त बीआयएस हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने आणि कलाकृती यांची विक्री केली जाईल. हे सोने १४, १८ आणि २२ कॅरेटमध्ये असेल . नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने ग्राहकाने ज्या कॅरेटचे पैसे दिले आहेत त्याच कॅरेटचे असतील.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
जुने दागिने विकतांना अडचण नाही
सोने हॉलमार्किंगचे नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. हे ग्राहकांना लागू होत नाहीत. ज्वेलर्स यापुढे हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने ग्राहकाला विकू शकत नाहीत, परंतु ग्राहक पूर्वीप्रमाणे हॉलमार्क नसलेले जुने दागिने ज्वेलर्सला विकू शकतात. ग्राहकांना जुने दागिने विकताना कोणतीही अडचण येणार नाही. ज्वेलर्स ग्राहकाकडून खरेदी केलेले जुने दागिने जसेच्या तसे हॉलमार्क करू शकतात किंवा ते वितळव ल्यानंतर नवीन दागिने बनवून हॉलमार्क करू शकतात.
HUID म्हणजे काय?
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक दागिन्यांची शुद्धता ओळखतो. हा ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्याद्वारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची सर्व माहिती मिळते. या कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली आहे. हा नंबर प्रत्येक दागिन्यावर असतो. देशभरात एकूण १,३३८ हॉलमार्किंग केंद्रे आहेत.