कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याला १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी केरळमध्ये अटक करण्यात आली आहे.
अलपुझ्झा जिल्ह्यात अरथुंगल येथे या नेत्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीशन असे या नेत्याचे नाव आहे. या मुलीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या नेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नेत्याकडून आपला अनेक वेळा विनयभंग करण्यात आल्याचे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त
गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
सदर मुलगी ही अनुसूचित जातीतील असून शाळेत तिला यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तिने ही माहिती सांगितली. या मुलीचे कुटुंब आणि सतीशन हे एकमेकांना ओळखतात. सतीशन हा अनुसूचित जाती सहकारी संस्थेचा अध्यक्षही आहे. त्यातून ही ओळख झालेली आहे. सतीशन याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याला पोलिस रिमांड देण्यात आला आहे.