मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने गुजरातमधील एका कंपनीवर छापा टाकून तिघांना अटक केली. या छाप्यात २५ लाख रुपये रोख,सोने आणि १० कोटी रुपये किंमतीचेन हिरे जप्त करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.’चीन नियंत्रित’ कर्ज देणाऱ्या मोबाइल अॅप्लिकेशनशी संबंधित हा छापा असल्याचे सांगण्यात येत आहे. सागर डायमंड्स लिमिटेड, आरएचसी ग्लोबल एक्सपोर्ट्स लिमिटेड ग्लोबल आणि या कंपन्यांचे संचालक वैभव दीपक शाह आणि त्यांचे सहयोगी यांच्या सूरत सेझ , अहमदाबाद आणि मुंबई येथील १४ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. हा तपास मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ‘पॉवर बँक अॅप’ विरुद्ध नोंदवलेल्या फौजदारी खटल्याशी संबंधित असल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. या अॅपद्वारे हजारो सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. हे ही वाचा: मुंबईचा प्रभात कोळी बनला सात समुद्रांचा राजा उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे? हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही! चिट फंड फसवणुकीशी संबंधित तपासाचा भाग म्हणून पश्चिम बंगालमधील दोन कंपन्यांवर छापे टाकून १.२७ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची ७९० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने१मार्च रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा व्यतिरिक्त पश्चिम बंगालमधील कोलकाता, सिलीगुडी आणि हावडा येथील १५ ठिकाणी छापे टाकले होते.