त्रिपुरा, नागालँड, मेघालय मध्ये आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या महत्वपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात तीनही राज्यांमध्ये निवडणुकीची चुरशीची लढत दिसत आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक झाल्या तर त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान झाले. तिन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या निवडणुकांच्या लढतीवरून भारतीय जनता पक्ष प्रबळ पक्ष दिसत आहे. आज ईशान्येतील तीन राज्यांमध्ये निवडणुकी आशावादी निकाल येत असून भाजप पक्षाला दिलासा तर मिळालाच आहे तर विरोधक थोडे अस्वस्थ झाले आहेत. भारतीय जनता पक्षासाठी आज ईशान्येच्या तीन राज्यांमध्ये आनंदाची बातमी आहे.
त्रिपुरामध्ये त्यांच्या सत्तेत पुनरागमनाचे चांगले संकेत मिळाले आहेत. नागालँड राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असून संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला अर्थात एनपीपीला मेघालय मध्ये सुरवातीची आघाडी मिळाली आहे. त्रिपुरामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आत्ताच्या परिस्थितीनुसार ६० सदस्यांच्या विधानसभेत त्यांची ३० जागांवर आघाडी आहे. तर सत्ता स्थापनेसाठी ३१ जागांचा विजय आवश्यक असतो. डावे पक्ष १५ , तर टीएमपी १४ जागा, तर इतर पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. नागालँड मध्ये भारतीय जनता पक्ष आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी एनडीपीपी युती यांची ३८ जागांवर आघाडी आहे, विधानसभेत एकूण ६० जागा असून बहुमताचा आकडा ३१ असा आहे.
हे ही वाचा:
ही जगताप साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे’
हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या
एनपीएफ चार जागा, काँग्रेस एक जागा, तर इतर पक्ष एकूण १७ जागांवर आघाडी आहे. मेघालयांत एकूण ६० जागांसाठी मतदान झाले आहे. ज्यामध्ये संगमा यांचा एनपीपी २० जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहे. , तर काँग्रेस पक्ष सहा जागांवर , आणि इतर पक्ष २७ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस पक्ष सहा जागा आणि इतर जागा २७ जागांवर आघाडीवर आहे.
.