28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण६० वर्षानंतर प्रथमच एका महिलेला आमदारकीचा मान

६० वर्षानंतर प्रथमच एका महिलेला आमदारकीचा मान

आज नागालँडमध्ये इतिहास घडणार

Google News Follow

Related

महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकीसोबतच ईशान्य भारतामधील तीन राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज येणार आहेत. नागालँड राज्य यंदा विशेष चर्चेत आहे त्याचे कारण पण तसेच आहे कारण ६० वर्षानंतर पहिल्यांदाच एक महिला आमदार निवडणूक जिंकणार असल्याची दाट   शक्यता वर्तवली जात आहे. आज  मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये विधानसभेची मतमोजणी सुरु झाली असून अगदी थोड्या वेळातच या तीनही राज्यांमधील स्थिती स्पष्ट होणार आहे. पण या निवडणुकीत नागालँड मधल्या चार उमेदवारांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण ६० वर्षांपासून इथे आता इतिहास बदलण्याची दाट  शक्यता आहे.

आत्तापर्यंत नागालँडच्या इतिहासात आमदार बनलेली नाही आहे. तर यावर्षी प्रथमच चारही मतदारसंघात महिलांचा दावा आहे. पण कोणत्या महिला आमदाराला हा मान मिळणार हे महत्वाचे असणार आहे. नागालँडचे आणखी एक वैशिठ्य म्हणजे येथे महिला मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तरीसुद्धा आत्तापर्यंत कोणीही महिला आमदार या पदापर्यंत पोचलेली नसून या खेपेला इतिहास घडणार असल्याचे दिसत आहे. एक दोन नाही तर चक्क चार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या  आहेत.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

नागालँड मध्ये १८३ उमेदवारांपैकी चार महिला निवडणुकीच्या मैदानात असून दिमापूर तृतीय विधानसभा मतदार संघातून एनडीपीपीने   हेखणी जाखलू यांना उमेदवारी दिली आहे. तेनिंग इथून काँग्रेसच्या रोसि थॉमसन या उभ्या आहेत. पश्चिम अंगामी  येथून एनडीपीपीच्या सलहौतुओनूओ आणि अटोइजू येथून भाजपच्या काहूली सेम मैदानात आहेत.  नागालँडमध्ये ६० विधानसभा मतदारसंघ आहेत. २७ फेब्रुवारीला इथे मतदान होऊन आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. एनडीपीपी आणि भाजप युती ३८ जागांवर आघाडींवर आहेत तर एनपीएफ चार आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत.

त्रिपुरात ६० विधानसभा जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले होते इथे ९०  टक्के  मतदान झाले असून राज्यात सत्ताधारी पक्ष भाजपचे इंडिजन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा सोबत युती आहे. युतीला डाव्या आणि काँग्रेसचे   आव्हान आहे. बऱ्याचशा एक्सिट पोलने भाजप युतीला बहुमत मिळेल असा निष्कर्ष काढला आहे. तर मेघालयात ८५.७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. मतमोजणी सुरु असून ६० हि विधानसभा मतदारसंघ आहेत. आधी इकडे भाजप आणि एनपीपीचे युती सरकार होते पण निवडणुकीआधी भाजप आणि नॅशनल पीपल्स पार्टीची युती तुटली. हा पक्ष येथे काय  चमत्कार दाखवणार हे बघावे लागेल.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा