राज्यसरकारच्या भारतीय खाण संचालनालय आणि केंद्राच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या सर्वेक्षणात सोन्याचा साठा सापडला आहे. त्यामुळे आपले परकीय चलन वाढण्यास मदत होणार आहे. ओडिशा राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के सोने सापडले आहे. भूवैज्ञानिकांनी या तीन जिल्ह्यात सर्वेक्षण केले असता त्यांना तिकडे मोठ्या प्रमाणांत सोन्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले आहे. देवगड, मयूरभंज, आणि केओंझार अशी त्या तीन जिल्ह्यांची नावे आहेत.
गेल्याच महिन्यात जम्मू-काश्मीर मध्ये लिथियमचा साठा मिळाल्याची माहिती समोर आली होती. तो साठा ५९ लाख टन एवढा आहे. त्यामुळे भारत देश लिथियमच्या साठ्यात आता तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. सध्या भारत देश लिथियमचा ९६ टक्के एवढ्या प्रमाणांत आयात करतो. त्यानंतर ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती आता मिळाली आहे. याच संदर्भात ओडिशा राज्याचे पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक यांनी सांगितले कि जीएसआय अर्थात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सर्वेक्षण करत आहे. या क्षेत्रातील पहिले सर्वेक्षण १९७० आणि १९८० च्या दशकात करण्यात आले होते. पण त्यावेळेस या सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले नव्हते.
हे ही वाचा:
मुंबईतील सेलिब्रिटिजच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याचा फोन
मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे
असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या
१०० कोटींच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक
भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी कार्यरत आहेत. कर्नाटकातील हट्टी आणि उटी क्षणी, झारखड मधील हिराबुद्दीनि खाणी आहेत. भारतात दरवर्षी एक पूर्णांक सहा टन सोन्याचे उत्पादन होते गेल्या वर्षी नीती आयोगाने देशातील संभाव्य सोन्याच्या खाणी ओळखण्यासाठी विस्तृत अभ्यास केला.
खाण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात सर्वात जास्त साठा हा दक्षिण भारतात कर्नाटकात आहे. जवळजवळ ८८ टक्के साठा हा फक्त कर्नाटकात आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने गेल्या वर्षी एका अहवालात असे म्हंटले आहे कि , खाणीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा तसेच नियामक सुधारणांद्वारे भारत लवकरच आपले सोन्याचे उत्पादन २० टन एवढे वाढवू शकतो