कोल्हापूरच्या अंबामाता परिसरात करण्यात आलेल्या खोदकामात विविध प्राचीन वस्तु सापडल्या आहेत. यात जर्मन बनावटीची बंदूक, शिवलिंग, घड्याळ, तांब्याची नाणी, विविध देव-देवतांच्या मूर्ती, विरगळ यांच्यासह धातूची विविध भांडी इत्यादी वस्तू कोल्हापूरच्या मणकर्णिका कुंडाच्या जवळ केलेल्या उत्खननात सापडल्या आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आणखी काही वस्तू मिळाल्या तर त्यांना देखील त्याच सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. लवकरच भाविकांना या वस्तू पहायला खुल्या केल्या जातील असे देवस्थान समितीकडून सांगण्यात येत आहे.
अंबाबाई मंदिराच्या परिसरातील मणकर्णिका कुंडाचे उत्खनन करण्यात येत होते. हे उत्खनन आता अंतिम टप्प्यात आले आहे. आत्तापर्यंत सुमारे २६ फुटांपर्यंत खोदकाम झाले आहे. अजून १३ फुट खोल खणण्यात येणार आहे. हे खोदकाम चालू असताना कुंडाचे मूळ रूप हळूहळू उलगडले जात आहे. या उत्खननात सापणाऱ्या वस्तूंची नोंद करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या उत्खननातून निघालेली माती देखील जपून ठेवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
डाव्यांच्या ‘खेळाचा’ अजून एक भारतीय बळी
‘एमपीएससी’ त नापास झालेले ठाकरे सरकार
हे कुंड ६० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे. या कुंडाला उत्तर आणि दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. आत्तापर्यंतच्या उत्खननातून माती आणि धातूच्या मूर्ती सापडल्या आहेत. त्याबरोबरच सव्वाशेहून अधिक तांब्याची नाणी देखील मिळाली आहेत.