“नाईक कुटुंबीयांना पुढे करुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील.” असे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खडसावले आहे. “मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे १२ नेते माझ्याविरोधात एकटवले होते. मात्र, आता हे सगळे कुठे गेले?” असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती. किरीट सोमय्या, ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकेची तोफ डागली. “रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे, त्याला तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील.” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
करवीर नगरीत सापडल्या प्राचीन वस्तू
महाराष्ट्र कोविड रुग्णवाढीत अव्वल
किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे परिवारावर हल्ला केल्यामुळे त्यांना चवताळलेल्या शिवसैनिकांकडून ‘ठाकरे’ शैलीचा सामना करावा लागत आहे.