23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे- केजरीवाल भेटीमागे मद्य घोटाळ्याचे कनेक्शन तर नाही ना?

उद्धव ठाकरे- केजरीवाल भेटीमागे मद्य घोटाळ्याचे कनेक्शन तर नाही ना?

भाजपा नेते, आमदार आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला प्रहार.

Google News Follow

Related

केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमागे दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे काही कनेक्शन आहे का, अशी शंका भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मराठी भाषेचा जागर या कार्यक्रमात केलेल्या भाषणाच्या निमित्ताने आशीष शेलार यांनी काही सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेट आणि त्याचवेळी दिल्लीतील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मद्य घोटाळ्याप्रकरणी झालेली अटक याची लिंक कुठेतरी लागते आहे. हे कनेक्शन महाविकास आघाडीपर्यंत तर पोहोचत नाही ना, सीबीआयने या अँगलने चौकशी करावी.

दिल्लीत झालेल्या मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनीही दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारप्रमाणेच मद्यविक्रीसंदर्भात अनेक सवलती जाहीर केल्या. नवे मद्यधोरण आणले होते. आपचे सिसोदिया तेव्हा मद्यसम्राटांशी व्यवहार करत होते तर इकडे महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विदेशी दारूबाबत सवलतींचा वर्षाव करत होते. विदेशी दारूवर ५० टक्के करमाफ करण्यात आला होता. बारवरील शुल्कमाफी करण्यात आली होती. किराणा माल विक्री करणाऱ्यांना मद्यविक्रीचे परवाने देण्यात येणार होते. त्यामुळे सीबीआयच्या चौकशीत या मद्य घोटाळ्याचे धागे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपर्यंत येत आहेत का, असा अंदाज व्यक्त करता येतो.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. त्यावरून शेलार यांनी टीका केली आहे. या मद्य घोटाळ्याचे कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत येईल या भीतीपोटी केजरीवाल ठाकरे यांना भेटायला आले असावेत.

उद्धव ठाकरेंना असराणी म्हणायचे का?

उद्धव ठाकरे वारंवार आमचे नेते अमित शहा यांचा चित्रपटातील पात्रांवरून उल्लेख करतात. त्यावर शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरेंची परिस्थिती समजण्यासारखी आहे. ते थयथयाट करत आहेत. वैफल्यग्रस्त आहेत, नैराश्य आले आहे त्यांना. पण राजकारणात काही मर्यादा पाळायच्या असतात. त्या सोडल्या तर आम्हीही सोडू शकतो. तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील असराणीसारखे आहात. शोलेमधील एका प्रसंगाप्रमाणे आधे इधर, आधे उधर आणि मागे काहीही नाही. तुम्ही वेळीच थांबला नाहीत तर आम्हालाही तसेच बोलावे लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा