23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामापुन्हा एक 'लव्ह जिहाद' प्रकरण , मुस्लिम तरुणाने हिंदू भासवत फसवले

पुन्हा एक ‘लव्ह जिहाद’ प्रकरण , मुस्लिम तरुणाने हिंदू भासवत फसवले

पिडीतेबरोबरच तिच्या मुलांचेही केले धर्मांतर

Google News Follow

Related

हरिद्वारमधल्या एका घटस्फोटित हिंदू महिलेला मुस्लिम तरुणाने त्याची धार्मिक ओळख लपवून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हि घटना हरिद्वारच्या लक्सर भागातल्या पठारी या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. या महिलेने   सांगितले की, भगवनपूर भागातल्या एका गावात तिचे लग्न झाले होते. तिला दोन मुलगे पण आहेत. पतीसोबतच्या घरगुती वादामुळे ती पठारी परिसरातील आपल्या गावी माहेरी राहत होती.

काही दिवसांपूर्वी जत बहादरपार येथे सचिन नामक व्यक्तीला ती भेटली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ज्वालापूर हरीलोक कॉलनीतल्या एका मौलवींकडे नेल्याचा आरोप तिने या व्यक्तीवर केला आहे. त्या मौलवीसमोर त्याने त्याचे खरे नाव उघड करून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले.  त्याबरोबरच आपल्या चार वर्षांच्या मुलांचेही धर्मांतर जबरदस्तीने केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्याने तिचे  मूळ नाव बदलून रेश्मा आणि मुलाचे अरमान अली असे ठेवले आहे. त्यानंतर जबरदस्तीने निकाह करून घरी घेऊन गेला.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

पुढे तिने असेही सांगितले कि, तो रोज तिला मारपीट करून जबरदस्तीने मास खायला घालत होता. त्या महिलेने सांगितले कि याने आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला जबरदस्तीने नमाज पढायला पण सांगण्यात आले होते.  त्यासाठी ते आम्हाला मारपीट पण करत असत. काही दिवसांपूर्वी त्याने तिला  भरपूर मारहाण करून पाथरी गावात सोडून दिल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. ती महिला ज्या भाड्याच्या घरात राहत होती त्या घरमालकाला आरोपी धमकावत असायचा. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असून स्टेशन प्रभारी निरीक्षक पवन डिमरी यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून आरोपीवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा