बँकांच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार नंतर सोमवारी आणि मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नऊ युनियन्सच्या एकत्रित युनियन फोरम ऑफ बँक युनिअन्सने (युएफबीयु) दिनांक १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारला आहे. सरकरातर्फे दोन मोठ्या सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात हा संप पुकारला गेला आहे. या कालावधीत इंटरनेट बँकींगवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कळले आहे. मात्र तरीही सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
हे ही वाचा:
सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या ‘निती’ला बळ
आर्थिक संकल्प २०२२ मध्ये सरकारने दोन बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. यासाठी मध्यम आकाराच्या किंवा छोट्या आकाराच्या बँकांची निवड करण्यात आली. त्यानुसार बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसिज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचे खासगीकरण होणार आहे. यानंतर कदाचित मोठ्या बँकांचे देखील खासगीकरण केले जाऊ शकते.
हे ही वाचा:
या चार बँकांचे होणार खाजगीकरण…
मात्र तरीही स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेत सरकार आपला मोठा हिस्सा राखून ठेवण्याची शक्यता आहे. स्टेट बँक अनेक ग्रामीण कर्ज पुरवठ्याच्या योजनांसाठी महत्त्वाची ठरत असल्याने सरकारकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.