26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

जयंत पाटील, अजित पवार यानंतर सुप्रिया सुळेसुद्धा शर्यतीत

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची लढाई चालू आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता सात महिने लोटले आहेत मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावी मुख्यमंत्री हा आपल्याच पक्षाचा होणार असे दिसत आहे. खरे आहे स्वप्न बघणे वाईट नसतेच. नाही का? आपल्याकडे काही विशेष असेल तर मोठे पोस्टर किंवा फोटो वगैरे लावण्याचा प्रघात आहे आणि जर का राजकीय पक्षाचे असतील तर त्यांचे तर खूपच मोठे मोठे पोस्टर्स आपल्याला बघायला मिळतात.

सध्या या अशाच पोस्टरच्या चर्चा सुरु आहेत कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा नेते मंडळींचे एकामागून एक असे पोस्टर्स आपल्याला बघायला मिळत आहेत  आणि त्या पोस्टरला शीर्षक हे ‘भावी मुख्यमंत्री’ असे देण्यात आल्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री अश्या आशयाचे पोस्टर लावण्यात आल्याने त्याची चर्चा आहे. 

यात पहिले जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होता त्यानंतर अजित पवार यांच्या नावाचे पोस्टर बघायला मिळाले आणि आता भावी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अश्या सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची गर्दी झाली आहे की काय, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १६ फेब्रुवारीला मुंबईतील नेपियन्सी रोड येथे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे पोस्टर होते , यामध्ये ज्या कार्यकर्त्याने हे पोस्टर लावले त्याचे नाव सुद्धा त्यावर लिहिण्यात आले होते. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यायच्या पोस्टर खाली कोणाचेच नाव लिहिण्यात आलेले नसल्यामुळे चर्चा होत आहे. या सर्व प्रकारची माध्यमांनी पण दाखल घेत पक्षांत काही वेगळे चालले नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. पण या सगळ्याची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या वतीने अज्ञातविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या या भावी मुख्यमंत्र्यांच्या या पोस्टरबद्दल विचारले असता म्हणाले कि  , राष्ट्रवादी पक्षामध्ये अशी पद्धतच आहे कि भावी म्हणून सांगत असतात, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. बघा असे आहे कि माझ्या अनुभवातून मी शिकलो कधी काहीही होऊ शकते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असे वाटले होते का ? पण ते बनले त्यामुळे ज्यांना ज्यांना भावी वाटते त्यांना खूप शुभेच्छा अशी कोपऱखळीच फडणवीसांनी मारली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा