27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया१९८४च्या दंगलीवर डॉक्युमेंट्री का येत नाही? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा खडा...

१९८४च्या दंगलीवर डॉक्युमेंट्री का येत नाही? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा खडा सवाल

मुलाखतीत लोकशाहीच्या नावावर काही लोकांकडून सुरू असलेल्या राजकारणाचा घेतला समाचार

Google News Follow

Related

बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाची चर्चा अजूनही देशभरात सुरू आहे. त्याचसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या माहितीपटाची निर्मिती करणाऱ्यांना आणि त्याच्या आधारावर नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या कानपिचक्या दिल्या आहेत.

इंडिया : द मोदी क्वेश्चन या नावाने असलेल्या या माहितीपटात २००२च्या गुजरात दंगलीचा संदर्भ आहे आणि त्यातून नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा आणि त्यांना आरोपी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यातून देशभरात वाद निर्माण झाला.

त्यासंदर्भात जयशंकर म्हणतात की, अशा या माहितीपटाच्या माध्यमातून भारत कसा कट्टरतावादी देश आहे, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, सरकार यांच्या प्रतिमेला कसा धक्का पोहोचविता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. हा खरे तर भारतविरोधी अजेंडा आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

आताच एकदम या माहितीपटाबद्दलच चर्चा का आहे? यापूर्वी अशा घटना कधी घडलेल्याच नाहीत का? दिल्लीत १९८४च्या दंगलीत अशाच घटना घडल्यात. पण त्यावर एखादा माहितीपट का येत नाही?  त्यामुळेच अशा अजेंडाला भुलू नका, उलट जे असे दावे करत आहेत त्यांना आव्हान द्या की त्यांनी राजकारणात उतरावे. हा अजेंडा तयार करणाऱ्या लोकांमध्ये राजकीय क्षेत्रात उतरण्याची ताकद नाही. ते एखादी एनजीओ, मीडिया हाऊस यांच्या आड हे राजकारण करत राहतात.

अनेक मंचांवर जयशंकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. तेथे त्यांनी भारतीय लोकशाहीचे नेहमीच गुणगान गायले आहे. केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जगासाठी भारतीय लोकशाही ही दिशादर्शक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

जयशंकर विचारतात की, लोकशाहीत तुमचा मतपेटीवर, लोकांनी दिलेला कौल यावर विश्वास नाही का? माझा आहे. पण काही लोकांची भूमिका दुटप्पी असते. त्यांना तुम्ही आवडता त्यामुळे तुम्ही निवडणूक जिंकलीत की, लोकशाहीचे कौतुक करतात पण तुम्ही निवडणुकीत जिंकू नये असे जेव्हा एखाद्याला वाटते तेव्हा छाती पिटणे चालू होते. तुम्ही निवडणूक जिंकू नये असे त्यांना वाटत असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा