26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाउत्तर प्रदेश टूरिझमच्या अधिकाऱ्याने केली चेंबूरला आत्महत्या

उत्तर प्रदेश टूरिझमच्या अधिकाऱ्याने केली चेंबूरला आत्महत्या

पोलिसांचा तपास सुरू

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश राज्याच्या टुरिझम विभागात अधिकारी असणारे विमलेश कुमार बनारसीदास ओदित्य (५९) यांनी मुंबईतील चेंबूर टिळक नगर येथील राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कामाच्या ताणतणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे त्यांची पत्नीने यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

टिळकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तारा गगन हाऊसिंग सोसा बिल्डिंग नंबर ९५, टिळक नगर मुंबई येथे ही घटना घडली.

हे ही वाचा:

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

जोशीमठमध्ये पुन्हा तडे.. चारधाम यात्रेचे काय?

एअर इंडिया- विस्तारा एअर लाइनचे विलीनीकरणाच्या दिशेने उड्डाण

या घटनेची हकीकत अशी : यातील मयत इसम नामे विमलेश बनारसी दास औदित्य यांनी तारा गगन हाऊसिंग सोसा बिल्डिंग नंबर ९५ टिळक नगर मुंबई येथून दुसऱ्या माळ्यावरून उडी मारल्याने त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. राजावाडी हॉस्पिटल येथील डॉक्टर श्रुतिका कांबळे यांनी मयत घोषित केले सदर बाबत त्यांची पत्नी नामे रमा औदित्या यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांचे पती यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ते उत्तर प्रदेश सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंट मध्ये कामास होता. त्यांचे कार्यालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई या ठिकाणी आहे व ते २०२२ पासून लखनऊ येथील मुख्य कार्यालयात डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करत आहेत.

सदर ठिकाणी कामाचा ताण असल्याने व घरापासून दूर राहावे लागत असल्याने त्यांनी दोन महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता व त्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत काम करण्यास उत्तर प्रदेश टुरिझम यांनी सांगितले होते .कामाच्या तणावातूनाच त्यांनी उडी मारल्याचे त्यांनी सांगितले जात आहे. औदित्य यांच्या मृत्यूचे कारण देताना उंचावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर घटनास्थळचा दोन पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करण्यात आला. केलेल्या चौकशी वरून त्याच्या पत्नीची तक्रार नसल्याचे सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा