26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसोसायटीत खेळणाऱ्या लहानग्याला कुत्र्यांनी चावून मारले

सोसायटीत खेळणाऱ्या लहानग्याला कुत्र्यांनी चावून मारले

भटक्या कुत्र्यांचा तो व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

हैदराबाद तेलंगणा येथे एका चार वर्षीय मुलाला कुत्र्यांनी चावून मारल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. त्या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. १९ तारखेला रविवारी ही घटना घडली.

प्रदीप नावाच्या या मुलाला रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी घेरले आणि त्याला चावे घ्यायला सुरुवात केली. त्यात तो जबर जखमी झाला. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या व्हीडिओत दिसते आहे की, एक लहान मुलगा इमारतीच्या कंपाऊंडमध्ये खेळतो आहे. तेव्हा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्या मुलाने कुत्र्यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला खरा पण कुत्रे त्याला चावत राहिले. शेवटी तो मुलगा निपचित पडून राहिला. तेव्हा त्या कुत्र्यांनी त्याचे चावे घेतले. त्याच्या वडिलांनी हे बघितले आणि ते त्या दिशेने धावले. त्यांनी त्या कुत्र्यांना हाकलवले. नंतर ते आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेले. पण तिथे आणल्यावर मात्र त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

जोशीमठमध्ये पुन्हा तडे.. चारधाम यात्रेचे काय?

मला विमानातून उतरवले, त्यांना नियतीने मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले!

पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा…

हाती आलेल्या माहितीनुसार या मुलाचे वडील गंगाधर हे निझामाबादमधून आहेत, पण नंतर ते आपल्या कुटुंबियांसमवेत हैदराबादला राहू लागले. ही घटना घडली तेव्हा गंगाधर हे कामाला गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास जारी आहे.

एखाद्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करणे ही पहिलीच घटना नाही. मागे अशाच एका हाऊसिंग सोसायटीत कुत्र्यांनी लहान मुलाला मारले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा