25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाबी.टेक. केलेले तरुण करत होते बनवाबनवी...पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बी.टेक. केलेले तरुण करत होते बनवाबनवी…पोलिसांनी आवळल्या मुसक्या

उत्तर प्रदेशातून करत होते ऑपरेट

Google News Follow

Related

परदेशातील बड्या कंपनीत आपले सिलेक्शन झाले असल्याचे सिलेक्शन पत्र मेल करून ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय ऑनलाइन जॉब रॅकेटचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोन उच्चशिक्षित तरुणांना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली असून हे दोघे आपापल्या घरातूनच ऑनलाइन जॉब रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. या टोळीने मागील एका वर्षात शेकडो तरुणांची वैयक्तिक माहिती नोकरी डॉट कॉम आणि टाईम्सजॉब डॉट कॉम या वेबसाईटवरून चोरी करून त्यांची फसवणूक केली आहे.

विकास कुमार महेंद्रप्रताप यादव (२४) आणि रिषभ मनीष दुबे (२३) असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नावे आहेत. विकास कुमार उत्तर प्रदेशातील नोएडा आणि रिषभ हा लखनौ येथे राहणारे आहेत. या दोघांनी पंजाबच्या लवली युनिव्हर्सिटी येथून बी-टेकचे शिक्षण घेतले आहे. या दोघांनी एक आंतरराष्ट्रीय बोगस कंपनी तयार करून या कंपनीची नोंदणी ‘नोकरी डॉट कॉम’ आणि ‘टाईम्सजॉब डॉट कॉम’ या वेबसाईटवर करून पासवर्ड आणि युजर आयडी मिळवला होता.

या वेबसाईटवर नोकरीसाठी टाकण्यात येणारी लोकांची वैयक्तिक माहिती चोरी केली जात होती, नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या व्यक्तीला कॉल करून तुमचे नोकरीसाठी या कंपनीत सिलेक्शन झाले आहे, लवकरच तुम्हाला कंपनीकडून मेल प्राप्त होईल असे सांगितले जायचे.

हे ही वाचा:

व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

६ रुपयाचे तिकीट फाडा.. इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसने फिरा

बागेश्वर धाममध्ये इतकी लोक आले पुन्हा हिंदू धर्मात

या खासदाराच्या घरी आहेत ५० घरटी.. १०० चिमण्यांचा रोज चिवचिवाट

बोगस कंपनीच्या नावाने संबंधित व्यक्तींच्या मेलवर सिलेक्शन लेटर पाठवले जात होते. त्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळी कारणे सांगून ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी सांगितले जात होते. अशा प्रकारे या दोघांनी मुंबईसह संपूर्ण भारतभर आपले जाळे टाकून लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली होती.

माटुंगा पोलिस ठाण्यात असाच एक गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी सपोनि. दिगंबर पगार,पाटील यांच्या पथकाने या टोळीचा तंत्रिकरित्या शोध काढून या टोळीची माहिती काढण्यात आली. त्यानंतर या टोळीतील दोघांना उत्तर प्रदेशातील लखनौ आणि नोएडा येथून गेल्या आठवड्यात अटक करून मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या टोळीवर मुंबई, ठाणे, तामिळनाडू, हैदराबाद, मिरत, तेलंगणा, सायराबाद, गुरुग्राम,कर्नाटक इत्यादी राज्यात १२पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून या टोळीने मागील एक वर्षात शेकडो तरुणांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली. या टोळीजवळून मोठ्या प्रमाणात डेबिटकार्ड, क्रेडिट कार्ड, बॅन पासबुक, मोबाईल फोन, लॅपटॉप इत्यादी वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत. या दोघांची बँक खाते गोठवण्यात आलेले असून या खात्यावर वर्षभरात दीड कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली,तसेच या दोघांचे आणखी सहकारी असण्याची शक्यता वर्तवली जात असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा