27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणनवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ

मराठीतून घेतली शपथ

Google News Follow

Related

आज महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांनी राजभवना तील दरबार हॉल मध्ये रमेश बैस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन अशी रमेश बैस यांनी शपथ घेतली. या सोहळयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा उपस्थित होते. शपथविधीच्या कार्यक्रमामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  तत्पूर्वी , सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भगतसिंह   कोश्यारी यांनी मागील आठवड्यात बारा फेब्रुवारीला राजीनामा दिला. होता. त्यांना शुक्रवारी राजभवनातून निरोप , देण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ गुरुवारी राजभवनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते ला. अनेक राज्यांचे राज्यपाल एकाच दिवशी बदलण्यात आले होते

रमेश बैस यांच्याबद्दल 
रमेश बैस यांचा जन्म दोन ऑगस्ट १९४७ ला मध्यप्रदेशमधील रायपूर येथे झाला. हे रायपूर आता छत्तीसगढ मध्ये आहे. रमेश बैस हे जुलै २०२१ मध्ये झारखंड चे राज्यपाल म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्याआधी ते जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांना परत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. मध्य प्रदेश भाजपचेते उपाध्यक्ष होते.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

रमेश बैस ह्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला महानगपालिकेतून सुरवात करून १९७८ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. होते नंतर १९८० ते ८४ ते विधानसभा सदस्य मध्यप्रदेशात होते. १९८५ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९८९ मध्ये रायपूर येथे लोकसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. सलग सात वेळा लोकसभा मतदार संघात ते खासदार राहिले आहेत. बैस यांनी केंद्रात सुद्धा राज्यमंत्रीपद भूषवले असून १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळांत रमेश बैस हे केंद्रीय पर्यावरण आणि स्वतंत्र प्रभारी म्हणून वन राज्यमंत्री होते.

वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी रसायन आणि खते , खाण , पोलाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.  पूर्वीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रविरोधात अनेक अवमानकारक शब्द वापरले होते. म्हणून त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. केंद्र सरकार राज्यपालांवर कठोर भूमिका घेत नाही अशी टीका झाल्यावर त्यांनी राजीनामा देण्याची उच्च व्यक्त केली त्यामुळे बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा