25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीमहाशिवरात्री विशेष : का आवडतात 'महादेवांना' बेलपत्र?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

समुद्रमंथनानंतर विषप्राशन करणाऱ्या भोलेनाथांना प्रचंड दाह होत होता

Google News Follow

Related

हिंदू धर्मात आपल्याकडे पाठ पूजेला अन्यन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे सर्व सण वार यांना त्यांच्या पध्दतीनुसार महत्व आहे. असाच हिंदू धर्मातील एक महत्वाचा मानला जाणारा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हि शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस मानतात. म्हणूनच भगवान शंकराची कृपा आपल्यावर राहण्यासाठी या पवित्र दिवशी उपास करून पूजा अर्चा करतात. मग कृष्ण चतुर्दशीला शिव पार्वतीचा विवाह झाला होता.  भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग मानला जातो.

भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी अगदी मोजक्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. शिवशंकर यांना तीन पानांचे बेलपत्र वाहतात. बेलपत्र हे फक्त त्रिदलीय म्हणजे तीन पानांचेच शिवपिंडीवर वाहावे किंवा पाच पानाचे वाहतात पण तीन पानांच्या बेलपत्राला विशेष महत्व आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का ,पहिल्यांदा शिवपिंडीवर बेलपत्र कोणी वाहिले होते. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाशिवरात्रीचा उत्सव आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा करतात घरातील लहान, मोठे सर्व जण पूर्ण दिवस उपास करून शिवआराधना करण्याचा हा दिवस असतो. देवळात शिवलिंगावर जलाभिषेक करून मनोभावे शिवाची आराधना करतात पांढरी फुले, तीन पानांचे बेलपत्र, दूध, चंदन असे या दिवशी शंकर पिंडीवर आपण अर्पण करतो. जेव्हा समुद्र मंथन चालू होते त्यावेळेस हलाहल विषसुद्धा बाहेर पडले पण ते विष कोण घेणार याबद्दल प्रश्नचिन्ह होते. देव दानव हे कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. मग सर्वांनी शिवराधना करून भगवान शंकरांनी ते विषप्राशन केले, पण त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या.

हे ही वाचा:

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

वेळकाढूपणा हवा म्हणून मोठ्या खंडपीठाची मागणी

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

इतक्या त्या तीव्र होत्या की, त्यामुळे त्यांचा गळासुद्धा निळा झाला म्हणून आपण त्यांना ‘नीलकंठ’ सुद्धा म्हणतो. पण त्या विषाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या मेंदूची उष्णता प्रचंड वाढत होती. त्यांनी शांत व्हावे म्हणून अनेक पवित्र नद्यांचे पाणी त्यांच्यावर अर्पण केले जात होते. तरीही त्यांची उष्णता कमी होत नव्हती.  त्यानंतर तीन पानांचे बेलपत्र महादेवांना अर्पण करण्यात आले. बेलाची पाने थंड असतात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत करतात. म्हणून शिवपूजनाला बेलाच्या पानाचा वापर करतात. तेव्हा  पासूनच भगवान शंकर यांना जल आणि बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. तेव्हापासूनच ही परंपरा सुरु झाल्याचे बोलले जाते.

आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. माता पार्वती या भोलेनाथांना प्रसन्न करू शकल्या नाहीत. तेव्हा एका बेलपत्रावर त्यांनी रामाचे नाव लिहून भगवान शंकरांना अर्पण केले. त्यानंतर त्यांच्यावर भोलेनाथ प्रसन्न झाल्यावर त्यांनी पार्वती मातेशी विवाह केला. म्हणूनच बेलपत्राशिवाय भगवान शंकराची उपासना पूर्णच होत नाही.  पौराणिक काळांत माता पार्वतीच्या कपाळावर घाम येत होता त्या घामाचे काही थेंब हे मंडन पर्वतावर पडले त्यापासून बिल्लू नावाचे झाड उत्पन्न झाले सर्व पवित्रस्थाने ही त्या बेलपत्राच्या देठांत आणि देवी पार्वती ही त्या झाडाच्या पानांमध्ये वास करते असे म्हंटले जाते. म्हणूनही शंकराला बेलपत्र प्रिय असल्याचे म्हटले जाते. पण बेलपत्र हे कायम तीन पानांचेच वाहिले जाते.  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा