26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषस्युडो सेक्युलरिझमचा चेहरा स्वरा भास्कर 'समाजवादी' फहाद अहमदशी विवाहबद्ध

स्युडो सेक्युलरिझमचा चेहरा स्वरा भास्कर ‘समाजवादी’ फहाद अहमदशी विवाहबद्ध

व्हीडिओ, फोटो शेअर करत केली माहिती जाहीर

Google News Follow

Related

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाविरोधात कायम गरळ ओकणारी आणि स्युडो सेक्युलरिझमचा चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्करने आता ‘राजकारणात’ एकप्रकारे प्रवेश केला आहे. तिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी विवाह केल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी विवाह केला होता आणि त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते पण तेव्हा त्यातून चेहरे स्पष्ट होत नव्हते. यावेळी मात्र तिने फहादशी विवाह झाल्याचे जाहीर केल्यामुळे त्यातल्या रहस्याचा उलगडा झाला आहे.

फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभाचा राज्य अध्यक्ष आहे. स्वरा भास्करने यासंदर्भातील एक व्हीडिओदेखील शेअर करत त्यातून फहाद आणि आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले आहे. या दोघांनी ६ जानेवारीला विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत विवाहनोंदणी केली. लग्नानंतर स्वरा रडत असल्याचेही दिसत आहे.

हे ही वाचा:

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

बाजीप्रभूच्या भूमिकेतील अजय पूरकरच्या घरी जायचेय का?

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधा

स्वराने या व्हीडिओत म्हटले आहे की, कधी कधी तुम्ही ज्याला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करता पण ती व्यक्ती तुमच्या जवळच असते. आम्ही प्रेमाच्या शोधात होतो पण प्रथम आमची मैत्री झाली आणि नंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. फहाद अहमद माझ्या हृदयात तुझे स्वागत आहे. या हृदयात खूप आकांत आहे पण ते हृदय तुझे आहे.

स्वराने जानेवारीत ज्या पुरुषाशी विवाह केल्याची घोषणा केली होती, त्याचे नाव आता समोर आले आहे. याआधी, स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा यांच्यात प्रेमप्रकरण असल्याचे बोलले जात होते. पण २०१९मध्ये त्यांच्यात बेबनाव झाला. स्वरा भास्करने याआधी २०२२मध्ये जहा चार यार या चित्रपटात काम केले होते. यानंतर तिचा कोणताही चित्रपट आलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा