जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील ज्येष्ठेश्वराचे मंदिर शंकराचार्य मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ते शंकराचे देऊळ आहे. झबरवान रेंजवरील शंकराचार्य टेकडीवरील हे प्राचीन मंदिर महाशिवरात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोषणाईने सजवले गेले होते. काश्मिरी पंडित हे हिंदू महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या रात्री महाशिवरात्र साजरी करतात. म्हणूनच, सर्वात प्राचीन स्मारकांपैकी एक असलेल्या शंकराचार्य मंदिरात काल दिव्यांची सुंदर सजावट करण्यात आली होती.
काश्मीर हे शैव पंथीयांचे मोठे श्रद्धास्थान मानले जाते. (हिंदू धर्मातील एक पंथ ज्याने भगवान शिव यांना सर्वोच्च मानले आहे). इथेच आदि शंकराचार्यांनी महादेवाच्या साथीला, देवी पार्वती यांना समर्पित, सौंदर्य लाहिरी हे भजन केले.
१९८० च्या दशकानंतर जेंव्हा मोठ्या प्रमाणात काश्मिरी पंडितांना पलायन करावे लागले, तेंव्हापासून आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू सण साजरे केले जात आहेत. इस्लामी फुटीरतावाद्यांनी काश्मीरमधील हिंदूंना हाकलून लावून इस्लामीकरणाचा प्रयत्न केला. अनेक हिंदूंची हत्या करून लाखो हिंदूंना पलायन करायला भाग पाडले गेले. त्याचबरोबर काश्मीरमधील अनेक हिंदू मंदिरे उध्वस्थ केली गेली. शिवमंदिरांपासून ते सूर्यमंदिरापर्यंत अनेक मंदिरे उध्वस्थ करण्यात आली होती.
२०२१ मध्ये अनेक वर्षांनी आज हिंदू सण खुलेपणाने साजरे केले जात आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे. त्यामुळेच श्रीनगरमध्ये मंदिराची सजावट करणे शक्य झाले आहे.