25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'प्रेमाच्या प्रतिक'ला अच्छे दिन!

‘प्रेमाच्या प्रतिक’ला अच्छे दिन!

गुलाबाच्या फुलांची परदेशात निर्यातही

Google News Follow

Related

‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं…’ कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता सतत कानावर आली की व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला याचा साक्षात्कार होतो. यादिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे गुलाब उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.

फुलांचा राजा म्हणजे गुलाब. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. बाराही महिने भरपूर मागणी असल्याने शेतकरी राजा फूलशेतीकडे वळला गेला आहे. सणवार, लग्न समारंभ, धार्मिक विधी अशा नानाविध कार्यक्रमासाठी गुलाबाची मागणी सतत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फुलांसाठी उत्तम बाजारपेठ दिल्ली होय. त्यापाठोपाठ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जयपूर, कोटा, चेन्नई, अहमदाबाद. तसेच भारतातून गुलाबाची फुले सिंगापूर, युरोप आणि पश्चिम आशियातील देशात भारतातील गुलाबाच्या फुलांना चांगली मागणी असते.

हेही वाचा :

सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही

गुगल कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा सापडला

मुंबईकरांसाठी भेट.. कूल कूल प्रवास करा एसी डबल डेकर ई-बसमधून

सर्वत्र व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची तयारी सुरू झाली असताना पुणे शहरात ११ लाख गुलाब दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील तळेगाव, मावळ भाग फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेसाठी या भागातून गुलाबाच्या फुलांची परदेशात निर्यातही होते. व्हॅलेंटाइन डेला गुलाबाला उच्चांकी दर मिळत असल्याने यंदा गुलाबाच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.

व्हॅलेंटाइन डे साठी मागणी असल्याने एरवी पाच रुपये दर असलेल्या गुलाबांच्या फुलांना पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. लाबाची २० फुलांच्या जुडीचा दर २०० रुपयांवरून ३०० रुपयांवर पोहोचला आहे. महाशिवरात्रीसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांना मागणी असल्याने निशिगंध, लिली, शेवंती या फुलांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जातेय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा