पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानामध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करणार आहेत. महर्षी दयानंद सरस्वती याबद्दल संबोधन करणार आहेत. महर्षी दयानंद यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त हे संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या सोहोळ्याचे उदघाटन करतील , असे पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदनात म्हंटले आहे. बारा फेब्रुवारी १८२४ मध्ये जन्मलेले महर्षी दयानंद सरस्वती हे एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन प्रचलित असलेल्या सामाजिक विषमतेचा सामना करण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली.
"We should never lie or leave the path of dharma due to fear of critics or due to greed." Maharshi Dayanand Saraswati (1824-1883)#dayanand200 #दयानंद200 #maharshidayanand #aryasamaj #dayanandsaraswati pic.twitter.com/ilXKTuq60o
— आर्य समाज The Arya Samaj (@thearyasamaj) February 10, 2023
देशाच्या संस्कृतीत आणि सामाजिक प्रबोधनात आर्य समाजाने सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर विशेष भर देऊन फार महत्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे की , महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्मदिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे आर्य समाजाच्या सकारात्मक गुणांची अत्यंत आनंदी पद्धतीने घोषणा करणे हे मुख्य उद्देश आहे. महर्षी दयानंद यांचे कार्य जगासमोर आणून आपल्या देशाचे यामुळे नाव मोठे होईल.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपला देश जगाच्या नकाशावर कशा प्रकारे मोठा होईल याचा विचार सतत करत असतात. असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच अशा उपक्रमांचे नेतृत्व करत असतात. महर्षी दयानंद यांची जयंती साजरी करणे म्हणजेच महर्षीं यांच्या जीवनाविषयी जवळून जाणून घेऊन त्यातून लोकांना , समाजाला बरेच काही शिकण्यासारखे आहे असेही पुढे निवेदनात म्हंटले आहे.